AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा चार्ज केल्यावर मुंबई ते अहमदाबाद नॉनस्टॉप प्रवास, Honda ची इलेक्ट्रिक कार सज्ज

जपानी कार निर्माती कंपनी होंडाने इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीने नुकतीच एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेदरम्यान याबाबतची विशेष घोषणा केली आहे.

एकदा चार्ज केल्यावर मुंबई ते अहमदाबाद नॉनस्टॉप प्रवास, Honda ची इलेक्ट्रिक कार सज्ज
Honda e: NS1
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 6:49 PM
Share

मुंबई : जपानी कार निर्माती कंपनी होंडाने इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीने नुकतीच एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेदरम्यान याबाबतची विशेष घोषणा केली आहे. येत्या पाच वर्षांत कंपनी चीनमध्ये 10 नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. यासह, कंपनीने तीन धाडसी आणि आकर्षक संकल्पना उघड केल्या आहेत. (Honda introduced new electric cars with 500 km range in single charge)

तिन्ही कार आगामी e:N सिरीजचा भाग आहेत. यामध्ये डबल डोर कूप, फोर डोर डाटी आणि एका स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलचा समावेश आहे. Honda e: NS1 कार सिंगल चार्जवर 500 किमीपर्यंतचा प्रवास करू शकते आणि गुगल मॅप्सनुसार दिल्ली ते कानपूर पर्यंतचा रस्ता 495 किमी आहे, त्यामुळे ही कार दिल्ली ते कानपूर पर्यंतचा प्रवास सिंगल चार्जमध्ये पूर्ण करू शकेल.

कंपनीने सादर केलेल्या या इलेक्ट्रिक कार्सची संकल्पना एखाद्या फिक्शन फिल्मसारखी वाटते, जी सध्या रस्त्यावर असलेल्या इतर इलेक्ट्रिक कार्सपेक्षा एकदम वेगळी आहे. कंपनी 2022 च्या मध्यापर्यंत निश्चितपणे दोन होंडा इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार आहे. या कार्सची नावे e:NS1 आणि e:NP1 अशी आहेत.

e:N सिरीजचा अर्थ काय?

होंडाची इलेक्ट्रिक वाहनांची श्रेणी, जी फक्त चीनपुरती मर्यादित असेल, त्याला e:N सिरीज म्हटले आहे. ई म्हणजे एक फर्म किंवा ई टेक्नॉलॉजी ब्रँड आहे. त्याच वेळी, ‘N’ now and next कडे इशारा करतो. होंडाच्या मते, e:N सिरीजच्या मॉडेल ईव्हीमध्ये विशेष विकसित केलेल्या आर्किटेक्चरचा वापर करतील.

e:N सिरीज कॉन्सेप्टचा पहिला सेट e: NS 1 आणि e: NP 1 आहे. यामध्ये एक क्रॉसओव्हरदेखील आहे. जी यलो आणि ब्लॅक कलरमध्ये येते. कारच्या डिझाईन बद्दल बोलायचे तर, यात आकर्षक फेस आणि स्पोर्टी बॅक दिली आहे. हा प्रोटोटाइप एप्रिलमध्ये ऑटो शांघाय 2021 मध्ये प्रदर्शित केलेल्या मॉडेलसारखाच आहे.

Honda e: NS1 कार 150 kW इलेक्ट्रिक मोटरसह येईल. जी समोरच्या एक्सएलला जोडते आणि ती चालवते. या कारचा टॉप स्पीड 150 किमी प्रतितास इतका आहे. पूर्ण चार्जवर या कारची बॅटरी 68.8 kWh बॅटरी पॅक वापरून 500 किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Honda introduced new electric cars with 500 km range in single charge)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.