चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, रोज नदी पार करणं धोकादायक!

| Updated on: Sep 16, 2022 | 7:37 PM

शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण हे या बोर्डी नदीमुळे खडतर असल्याचे दिसून येते. या बॉर्डर नदीला जास्त पाणी राहिले तर या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, रोज नदी पार करणं धोकादायक!
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास
Image Credit source: t v 9
Follow us on

अकोला : जिल्ह्यातल्या अकोट (Akot) तालुक्यामधील वडाळी देशमुख (Wadali Deshmukh) हे गाव राजकीय दृष्ट्या बहुचर्चित आहे. पण, वडाळी देशमुख विकासाच्या दृष्टीने मात्र जैसे थेच आहे. या गावात कुठलीही सुधारणा नसल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजीनगर (Shivajinagar) हे छोटसं गाव बोर्डी नदीच्या तिरावर वसलेलं आहे. संपूर्ण मजूर वर्गाचा संपर्क गावापासून तुटलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याचं प्रकारची सोयी-सुविधा उपलब्ध नाही. त्यांना आज रोजी दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नेहमीच नदी पार करावी लागते. शालेय विद्यार्थ्यांना वाहत्या प्रवाहातून मार्ग काढावा लागतो.

गुडघाभर पाण्यातून प्रवास

चिमुकले विद्यार्थी हे गावांमध्ये शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात टाकतात. पाण्याच्या प्रवाहातून शाळेत जाण्यासाठी रोज प्रवास करतात. दररोज सकाळी शाळेमध्ये जाण्यासाठी शिवाजीनगर येथील विद्यार्थी हे बोर्डी या ठिकाणी येतात. त्यासाठी त्यांना दररोज बोर्ड नदीच्या गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतो.

अशी आहे गावकऱ्यांची तक्रार

ही अत्यंत दयनीय बाब आहे. यावर आजपर्यंत कुठल्याच स्थानिक राजकारणी पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. आमदार, जिल्हा परिषद, तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने माध्यमातून कुठल्याच प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नाही. छोटे खाणी पूल त्या ठिकाणी आजपर्यंत बांधण्यात आलेला नाही. अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.

हे सुद्धा वाचा

गावकऱ्यांची मागणी काय

शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण हे या बोर्डी नदीमुळे खडतर असल्याचे दिसून येते. या बॉर्डर नदीला जास्त पाणी राहिले तर या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे. लवकरात लवकर बोर्डी नदीवर पूल बांधण्यात यावा. अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. असं शिवाजीनगरचे रहिवासी प्रकाश काळे यांनी सांगितलं.