पाचवा दिवस, अजूनही तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता, मृतांची संख्या 53 वर; शोधकार्य सुरूच

तळीये गावात आज पाचव्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. आतापर्यंत बचाव पथकाला 53 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 32 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. (Maharashtra Rains: Death toll in flood hit Taliye reaches 53)

पाचवा दिवस, अजूनही तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता, मृतांची संख्या 53 वर; शोधकार्य सुरूच
Taliye village Landslide
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 26, 2021 | 10:21 AM

महाड: तळीये गावात आज पाचव्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. आतापर्यंत बचाव पथकाला 53 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 32 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. मात्र, पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला चिखल यामुळे बचाव पथकाला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा निर्माण होत आहे. (Maharashtra Rains: Death toll in flood hit Taliye reaches 53)

पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत. डोंगराच्या दरडीबरोबर दोन ते चार किलोमीटरपर्यंत हे नागरिक घरंगळत गेले असावेत असं सांगितलं जातं. त्यामुळे या संपूर्ण दोनचार किलोमीटरच्या परिसरातही शोधाशोध करण्यात येत आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने आज सकाळपासूनच शोध मोहीम हाती घेतली आहे. मात्र, पाऊस जास्त असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत आहे. तसेच सर्वत्र चिखल झाल्याने त्यातून मार्ग काढत जाणंही कठिण होत आहे.

अशी घडली घटना

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

राज्याची परिस्थिती काय?

राज्यात पूरग्रस्त भागातून सुमारे 2 लाख 30 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. राज्यात एकूण 149 मृत्यू झाले आहेत. 3248 जनावरांचे मृत्यू झाले आहेत. एकंदर 50 लोक जखमी आहेत. 100 लोक अजूनही बेपत्ता आहेत 875 गावे बाधित (Maharashtra Rains: Death toll in flood hit Taliye reaches 53)

संबंधित बातम्या:

Taliye landslide: तळीयेत 35 महिला, 10 मुलांसह 50 जण अजूनही बेपत्ता; जिल्हाधिकारी निधी चौधरी घटनास्थळी

Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं

Maharashtra Rain Landslides LIVE | सांगलीकरांनो आणखी पाणी पातळी वाढणार, 10 हजार लोक स्थलांतर

(Maharashtra Rains: Death toll in flood hit Taliye reaches 53)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें