AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा सन्मान, विष्णुपुरी जलाशयाजवळ स्मारक होणार

नांदेड शहरासह जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयाजवळ देशाचे माजी गृहमंत्री, जलक्रांतीचे जनक आणि आधुनिक भगीरथ डॉ. शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा सन्मान, विष्णुपुरी जलाशयाजवळ स्मारक होणार
शंकरराव चव्हाण
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 7:33 AM
Share

नांदेड : सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत नांदेड शहरासह जिल्ह्याला समृद्ध करणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयाजवळ देशाचे माजी गृहमंत्री, जलक्रांतीचे जनक आणि आधुनिक भगीरथ डॉ. शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून स्मारक उभारणीसाठी 13.26 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता व आराखड्यास नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली आहे.

शंकरराव चव्हाण यांचा सन्मान

नियमाक मंडळाच्या पुढील बैठकीत हा ठराव कायम करण्याची वाट न पाहता कार्यकारी संचालकांनी कार्यवाही करण्यास नियामक मंडळाची सर्वानुमते मान्यता देण्यात येत आहे, असे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता म. र. अवलगावकर यांनी प्रशासकीय मान्यता आदेशात म्हटले आहे.

शंकररावांचं धरणं उभारणीतील योगदान अत्यंत मोठं

14 जुलै 2019 ते 14 जुलै 2020 दरम्यान डॉ शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष हे विविध कायर्क्रमाच्या माध्यमातून साजरे करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रकल्प, धरणे उभारणीतील योगदान अत्यंत मोठे आणि मोलाचे राहिलेले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज जायकवाडी, विष्णुपुरी या प्रकल्पामुळे मराठवाड्याची तहान भागविली जात आहे.

विष्णुपुरी जलाशयाजवळ स्मारक

त्यांच्या या कार्याची पुढील पिढीला माहिती व्हावी, त्यांचे कार्य चिंरतन स्वरुपात एखाद्या स्मारकाच्या रुपात कायम ठेवावे या हेतूने शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयाजवळ त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या दि. 10 जुलै 2020 रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत स्मारक उभारणीविषयी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने  वास्तूविशारदाकडून  स्मारकाचा आराखडा व अंदाजपत्रक मागविले होते. त्यानंतर राज्य शासनाने नऊ मार्च 2021 राेजी या स्मारकासाठी महामंडळाच्या स्वनिधीतून खर्च करणे प्रस्तावित असल्याने नियामक मंडळाने प्रशासकीय मान्यता देणे उचित होईल, असे निर्देश दिले होते.

नांदेड शहराच्या वैभवात भर पडणार

त्यानुसार फोटीर्ज इन्फ्रास्ट्रक्चर अॅडव्हायजरी सर्विस या वास्तूविशारदाकडून  शंकरराव चव्हाण स्मारकाचे आराखडा व अंदाजपत्रक तयार करुन घेण्यात आले होते. त्याला 2 जून 2021 रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जलाशयाजवळ उभारण्यात येणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मारकामुळे नांदेड शहराच्या वैभवात आणखी भर पडणार असून शहरात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटक यांसाठीही हे आकर्षण ठरणार आहे.

(Memorial of Shankarrao Chavan near Vishnupuri reservoir in nanded)

हे ही वाचा :

अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश, आता नांदेडवरुन विमानाने तिरुपतीला जाता येणार, पाहा फ्लाईटचं टाईम-टेबल

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.