Ahmednagar Murder : अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल

राहात्या घराच्या गच्चीवर वृद्ध पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारात बुधवारी उघडकीस आली. या घटनेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात असताना या दाम्पत्याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Ahmednagar Murder : अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल
अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल
Image Credit source: TV9
मनोज गाडेकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 03, 2022 | 10:20 PM

अहमदनगर : कोपरगावमधील दुहेरी हत्याकांड (Double Murder) प्रकरणी अज्ञातांविरोधात हत्ये (Murder)चा आणि चोरी (Theft)चा ‌गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील आपेगावात गुरुवारी वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. दत्तात्रय भुजाडे (75) आणि राधाबाई भुजाडे (65) अशी मयतांची नावे आहेत. घराच्या गच्चीवर पती पत्नीचे मृतदेह आढळले होते. तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. घरातील 1 लाख 90 हजाराचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादवि कलम 302, 397, 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक डॉ.बी.जी शेखर पाटील आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपासासाठी पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.

घरात वृद्ध दाम्पत्य एकटेच होते

राहात्या घराच्या गच्चीवर वृद्ध पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारात बुधवारी उघडकीस आली. या घटनेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात असताना या दाम्पत्याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.बी.जी शेखर यांनी शुक्रवारी कोपरगावमध्ये घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आपेगाव शिवारात असलेल्या आपल्या शेतातील घरात दत्तात्रय भुजाडे आणि राधाबाई भुजाडे हे वृद्ध दाम्पत्य राहत होते. त्यांचा मुलगा जालिंदर कामानिमित्त पुणे येथे आहे.

आई-वडिल फोन उचलत नव्हते म्हणून मुलाने मित्राला घरी पाठवले

दोन दिवसांपासून फोन करून देखील आई-वडील फोन उचलत नसल्याने त्याने आपल्या तिळवनी येथील मित्राला घरी जाऊन खात्री करण्याचे सांगितले. यावेळी पोपट भुजाडे यांनी 1 जून रोजी दुपारच्या सुमारास आपेगाव येथे दत्तात्रेय भुजाडे यांच्या घरी जावून आवाज दिला. दरवाजा वाजवला तरी आतून काहीच उत्तर मिळत नसल्याने त्यांनी घराशेजारील विद्युत पोलवर चढून गच्चीवर डोकावून पाहिले असता दोन्ही पती-पत्नी मृतावस्थेत गादीवर पडलेले दिसून आले. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी भेट दिली. दरम्यान या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू कशामुळे झाला याबद्दल अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र चोरीच्या उद्देशाने या दाम्पत्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (Murder and theft case filed in Ahmednagar double murder case)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें