VIDEO: ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का?; नारायण राणे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

| Updated on: Dec 11, 2021 | 8:49 PM

तपास यंत्रणाकडून केल्या जात असलेल्या छापेमारीवरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे.

VIDEO: ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का?; नारायण राणे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल
narayan rane
Follow us on

सिंधुदुर्ग: तपास यंत्रणाकडून केल्या जात असलेल्या छापेमारीवरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? असा सवाल नारायण राणे यांनी केला.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केलं. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? असा सवाल करतानाच सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती, असा दावा राणे यांनी केला आहे.

मी कागदपत्रं न घेता संसदेत बोललो

संसदेतील भाषणावरून राणेंना ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी आपली बाजू मांडली. संसदेत विचारण्यात आलेला प्रश्न मला समजला होता. अध्यक्षांना वाटलं तो समजला नसेल म्हणून त्यांनी मला पुन्हा सांगितला. आता तुम्हाला जे काही ट्रोल करायचं ते करा. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात मी माहिती दिली होती. शिवसेनेनी ट्रोल केलं त्यांना काय करायचं ते करू दे. पण आपण सुद्धा याचं उत्तर देवू, असं आव्हानाच त्यांनी शिवसेनेला दिलं.

राऊत प्रवक्ते कुणाचे?

भाजपने देशाचं ऐक्य तोडण्याचं काम केलं या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य तोडलं नाही. संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? दिल्लीत ते शरद पवार यांच्या कार्यालयातच असतात. शिवसेनेचे आहेत असं ते दाखवतात तसे संजय राऊत नाहीत. त्यांनी शिवसेनेत काय केलं? लावालावीचं काम करणं त्याच नाव संजय राऊत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार

मुंबई-गोवा महामार्गाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं. मात्र रत्नागिरीत तसे नेते नाहीत, वादावादीत तो रस्ता तसाच राहिला. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो आहे.

सरकार चालतच नाही

राज्यातलं आताच सरकार चालत नाहीत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. राज्याचा विकास रखडला आहे. नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाहीत. केंद्रात मला अनेक जण येवून सांगतात हे सुप्रिया सुळे यांना सांगा, असा टोलाही त्यांनी लगावला.

फडणवीसांचा पत्ता कापला जाणार नाही

फडणवीसांचा पत्ता कापण्यासाठी तावडेंना दिल्लीत आणलंय का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, विनोद तावडे हे महासचिव आहेत. ते महाराष्टापुरते नाहीत. देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटायला दिल्लीत त्यांना पाठवलं नाही. पंख छाटायला विनोद तावडे एकटे नाहीत. त्यांच्यावर जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आहेत. त्यामुळे तसं होणार नाही, असं सांगत त्यांनी फडणवीसांची बाजू सावरून धरली.

पालिकेत सत्ता बदल होणार

यावेळी मुंबई महानगरपालिकेत सत्ता बदल दिसणार असल्याचा दावा त्यांनी केला. मी 55 वर्ष राजकारणात आहे. त्यामुळे यासाठीचे धोरण मी सांगणार नाही. तीन पक्षांना कुठलीच निवडणुक नकोत. जनता त्यांना निवडून देणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे निवडणुका नको आहेत आणि त्या पुढे ढकलल्या जातायत अशी मागणी आघाडी सरकार करतेय. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचं काम छगन भुजबळांकडे दिलं गेल्याची खोचक टीका त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

नाना पटोलेंबाबतच्या ‘त्या’ व्हायरल मेसेजने खळबळ, कारवाई करा अन्यथा उपोषण करू; माजी नगरसेवकाचा इशारा

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी बनले हिंदूंच्या आस्थेचा चेहरा, कोणत्या मंदिरांच्या निर्माण कार्यात मोदींचं मोठं योगदान?

Narayan Rane Live | संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे? : नारायण राणे