उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघालेत, निलेश राणेंची टीका; कोकणातील शिवसैनिकांच्या हाती कमळ

कुडाळ हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमधे जाहीर प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघालेत, निलेश राणेंची टीका; कोकणातील शिवसैनिकांच्या हाती कमळ
निलेश राणे


सिंधुदुर्ग: कुडाळ हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमधे जाहीर प्रवेश केला आहे. नुकताच कुडाळ पंचायत समितीच्या सदस्यांचा भाजप मध्ये प्रवेश करून निलेश राणेंनी सेनेला धक्का दिला होता.त्यानंतर आता पुन्हा हूमरमळा गावातील युवा सेनेचे शाखा प्रमुख विरेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिला व युवकांना भाजपमधे प्रवेश देऊन शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांना निलेश राणे यांनी दुसरा धक्का दिला असून यापुढे असे अनेक धक्के वैभव नाईक यांना बसतील असा इशारा निलेश राणेंनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधकांवर केलेल्या टिकेला माजी खासदार निलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लूटायचे मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघालेत, असा आरोप निलेश राणेंनी केला आहे.

वैभव नाईकांना दुसरा धक्का

नुकताच कुडाळ पंचायत समितीच्या सदस्यांचा भाजप मध्ये प्रवेश करून निलेश राणेंनी सेनेला धक्का दिला होता. कुडाळ हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमधे जाहीर प्रवेश केला आहे. युवा सेनेचे शाखा प्रमुख विरेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिला व युवक भाजपमध्ये दाखल झालेत. यामुळं शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांना निलेश राणे यांनी दुसरा धक्का दिला असून यापुढे असे अनेक धक्के वैभव नाईक यांना बसतील असा इशारा निलेश राणेंनी दिला आहे.

निलेश राणेंची दसरा मेळाव्यावर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधकांवर केलेल्या टिकेला माजी खासदार निलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लूटायचे मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघालेत. ते मुख्यमंत्र्यांसारख कधीच बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांची क्वॉलिटी त्यांच्यामधे नाही ते वायफळ बडबड करतात त्यांच्या विचारांची मर्यादाचं तेवढी आहे. त्यामुळे ते दुसरं काही बोलू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे.

निलेश राणेंची कुडाळ विधानसभेची तयारी?

कुडाळ विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून तयारी सुरु करण्यात आल्याचं कळतंय. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं गेल्या काही दिवासांपासून निलेश राणेंनी शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेतून भाजमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या सदस्यांनी आपण इथल्या आमदारांवर नाराज असल्याने आपण शिवसेना सोडल्याचं सष्ट केलं होतं.

इतर बातम्या:

उद्धव ठाकरेंच्या 1 तासाच्या भाषणाची फडणवीसांकडून 17 मिनिटांत चिरफाड, हल्ले, टोले आणि सल्ले!

VIDEO: मोदींकडून एजन्सींचा गैरवापर नाहीच, तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं; फडणवीसांचा हल्लाबोल

Nilesh Rane slam Uddhav Thackeray at the time Shivsena workers joins BJP at Kudal

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI