Chandrapur Wildlife : अनोखं प्रेम! चंद्रपुरातील दोन घरी नीलगाय पाहुणी म्हणून आली, कुटुंबीयांनीही तिला प्रेमानं कुरवाळलं

घरी पाहुणा येतो, तशी तिची खातरदारी करण्यात आली. कोणत्याही प्रकारची इजा तिला करण्यात आली नाही. उलट तिच्याशी प्रेमाची वागणूक देण्यात आली. त्यामुळं वनविभागाची डोकेदुखी कमी झाली.

Chandrapur Wildlife : अनोखं प्रेम! चंद्रपुरातील दोन घरी नीलगाय पाहुणी म्हणून आली, कुटुंबीयांनीही तिला प्रेमानं कुरवाळलं
चंद्रपुरातील दोन घरी नीलगाय पाहुणी म्हणून आलीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 9:44 PM

चंद्रपूर : चंद्रपूर तसा वाघांसाठी फेमस जिल्हा. वाघ बघण्यासाठी दूरवरून पर्यटक इथं येतात. इथलं वन्यजीव (Wildlife) जिल्हाचे वैभव ठरलेत. मानव-वन्यजीव संघर्षही इथं टोकाला गेलेला आहे. मात्र वरोरा (Varora) तालुक्यात घडलेल्या एका घटनेने मानव-वन्यजीव प्रेमाचा नवा अध्याय लिहिला. घरात शिरलेली निलगाय बिनधास्त एखाद्या पाहुण्यासारखी बसली होती. दुसरीकडे घरातील सदस्य न घाबरता तिला तितक्याच प्रेमानं घरात आसरा दिला. वरोरा तालुक्यातील मजरा (Majra) गावात आज नीलगाय आली. ती दोन घरांमध्ये शिरली. घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही निलगाय घरात पाहुण्यासारखी बसली होती. घरातील सदस्यांनी तिला तितक्याच प्रेमानं वागविलं. मानव-वन्यजीव प्रेम संबंधाचा नवा अध्याय यावेळी दिसला.

मुक्त अधिवासात सोडण्यात आले

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. जखमी नीलगाईस ग्रामस्थांच्या मदतीने पकडून उपचाराकरिता वरोरा शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारानंतर निलगायीला मुक्त अधिवासात सोडण्यात आले. गावात प्राणी येणे हे काही नवे नाही. पण, घरी आल्यानंतर त्यांना प्रेमानं समजून घेणारे खूप कमी. या व्हिडीओत नीलगायीला कुरवळताना दिसत आहेत. दोन-तीन कुटुंबीय दिवाणवर बसले आहेत. बाजूला नीलगाय शांतपणे बसली आहे.

मजरावासी झाले आनंदित

गायीच्या स्पर्शानं रक्तदाब नियंत्रणात येत असल्याचे प्रयोग विदेशात सुरू आहेत. नीलगाय ही तशी त्याच वर्गातली पण, ती जंगलात राहते. माणसाचं काही प्रत्येक्ष नुकसान करत नाही. गवत खाऊन राहणारा प्राणी. पण, तो गावात आल्यानं मजरावासी आनंदित झाले. घरी पाहुणा येतो, तशी तिची खातरदारी करण्यात आली. कोणत्याही प्रकारची इजा तिला करण्यात आली नाही. उलट तिच्याशी प्रेमाची वागणूक देण्यात आली. त्यामुळं वनविभागाची डोकेदुखी कमी झाली. अन्यथा गावात प्राणी आले की काही गावातील लोकं या प्राण्यांवर हल्ले करतात, असा वनविभागाचा अनुभव आहे. मात्र, या प्रकरणामुळं वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी झालेला पाहायला मिळाला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.