AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यालायानं दिलासा दिला होता.

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका
इंदोरीकर महाराज
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 5:30 PM
Share

अहमदनगर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यालायानं दिलासा दिला होता. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या खटल्यात संगनमेर कोर्टानं इंदोरीकर महाराजांच्या बाजूनं निकाल दिला होता. महाराष्ट्र अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानं इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षही उच्च न्यायालयात

संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द केला होता. संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र अंनिसनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्यावतीनं देखील संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. इंदोरीकर यांच्या कथित पूत्रप्राप्तीसंदर्भातील विधानावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला होता. सरकारी पक्षाच्यावतीनं गुरुवारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

इंदोरीकर यांनी वक्तव्य कुठे कधी केलं याचा पुरावा मिळत नाही

इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. इंदोरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करुन या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून 2020 रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलं होतं.

इतर बातम्या: 

Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांचं मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य, 8 महिन्यांनी कोर्टाचा मोठा निकाल

मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य भोवलं, इंदोरीकर महाराजांवर गुन्हा

Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावंच लागणार!

Nivrutti Maharaj Indorikar problems increased in case of girl child born statement due to Government party and Aanis file petition at Mumbai high Court bench of Aurangabad against

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.