आई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत

आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीने देखील या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथील शिंदे कुटुंबियांवर आली आहे. (Mother and daughter also died of corona Between 8 days in Akole Ahmednagar)

आई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत
मायलेकीचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर :  आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीने देखील या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथील शिंदे कुटुंबियांवर आली आहे. सुकृता हिने पत्रकारितेमध्ये पदवी प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली. (Mother and daughter also died of corona Between 8 days in Akole Ahmednagar)

मुलीची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी

अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे आज पहाटे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली.

आईचं आठ दिवसांपूर्वी निधन

सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय-लेकीचा पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न झाले आहेत. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.

माय लेकीवर एकत्रित दशक्रिया करण्याची वेळ

आईच्या जाण्यानंतर सुकृता अस्वस्थ होती. तिच्यावरही कोरोनाचे उपचार सुरु होते. मात्र आईच्या जाण्याचा तिच्यावर फार मोठा आघात झाला होता. ती पुरती हादरुन गेली होती. अखेर तिनेही आईपाठोपाठ प्राण सोडले. आता शिंदे कुटुंबावर मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ आली आहे.

पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक जवळच्या लोकांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यातील एक म्हणजे सुकृता शिंदे. कोरोनाशी झुंज देत असतांनाच ती हे जग सोडून गेली. मायलेकींच्या अकाली जाण्याने शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. शिंदे कुटुंबावर मोठा आघात झालाय.

(Mother and daughter also died of corona Between 8 days in Akole Ahmednagar)

हे ही वाचा :

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण?

जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्यास आधी रुग्णालयात न्या, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI