आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असं काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं : पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी परळी (Parali) इथं पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. पंकजा मुंडे यांना सध्या सोशल मीडियावर पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत अशा पोस्ट फिरत असल्याबाबत विचारण्यात आलं.

आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असं काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं : पंकजा मुंडे
Pankaja Munde
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 11:58 AM

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी परळी (Parali) इथं पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. कोकणात महापुरामुळे हाहाकार माजला आहे. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. सरकारकडून मदत मिळतेच आहे तरीही आपली मदत तिथपर्यंत पोहचविणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण मदत फेरी काढत असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

यावेळी पंकजा मुंडे यांना सध्या सोशल मीडियावर पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत अशा पोस्ट फिरत असल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, आता हा विषय नाही. सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. आता सगळं शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असं काही नाही, आता महाराष्ट्रावर आलेलं संकट आणि त्यासाठी समर्पण हे महत्त्वाचं आहे”.

प्रत्येक संकटात मदत

आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी सूचवलं मदत फेरी करुन पूरग्रस्तांना मदत करुया. माझ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पूरग्रस्त भागात मी जाणार नाही, मदत पोहोचवणार

मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथे मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचं आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

परिस्थिती खूप कठीण आहे, बिकट आहे. काही गावं मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभं करावं लागेल. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

VIDEO : पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

संबंधित बातम्या 

सरकारमध्ये आंतरविरोधाला सुरुवात, सध्या एक्स्ट्राऑर्डिनरी संकट, एक्स्ट्राऑर्डिनरी निर्णय घ्या : देवेंद्र फडणवीस  

मुख्यमंत्रीसाहेब विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ द्या, मराठवाड्यातील आमदाराचं फेसबुक लाईव्ह करुन आवाहन

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.