AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरकरांचा ‘सुप्रीम’ विजय, माधुरी हत्तीण नांदणी मठात राहण्याचा मार्ग मोकळा, पेटाला दणका

Supreme Court on Elephant Madhuri: कोल्हापूरकरांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात नांदण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. PETA ने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि पेटाला दंडही ठोठावला आहे.

कोल्हापूरकरांचा 'सुप्रीम' विजय, माधुरी हत्तीण नांदणी मठात राहण्याचा मार्ग मोकळा, पेटाला दणका
माधुरी हत्तीण नांदणी मठात राहण्याचा मार्ग मोकळा
| Updated on: Oct 09, 2026 | 12:19 PM
Share

कोल्हापूरकरांच्या लोकलढ्याला आज मोठे यश मिळाले. माधुरी हत्तीण नांदणी माठात राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पेटा या प्राणीमित्र संघटनेने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. इतकेच नाही तर पेटा संस्थेला सर्वोच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून माधुरी हत्तीणीवरून कोल्हापूरमध्ये वातावरण तापले होते. सर्वच राजकीय पक्षांसह संघटनांनी हत्तीण नांदणी मठाबाहेर नेण्यात तीव्र विरोध केला होता. आता त्यांच्या लढ्याला कायदेशीर बळ मिळाले आहे.

कोर्टाने पेटाला फटकारले

कोल्हापूरमधील नांदणी मठातून माधुरी हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पात आणण्यात आले होते. त्याविरोधात कोल्हापूर भडकले होते. कोल्हापूरात लोक रस्त्यावर उतरले होते. माधुरीला परत नांदणी मठात आणण्यासाठी लोकलढा तीव्र झाला होता. काही दिवसानंतर हत्तीणीला परत पाठवण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. त्यानंतर माधुरी मठात परत आली होती. पण माधुरी मठात परत आल्यानंतर तिला फटक्याचा त्रास सहन करावा लागला. ती पुन्हा साखळदंडात एकाकी जीवन जगत असल्याचा दावा करत पेटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. माधुरीला पुन्हा वनतारामध्ये पाठवण्याची विनंती पेटाने याचिकेत केली होती. याप्रकरणी सुनावणी झाली असता ‘सगळे लोक आनंदी असताना तुम्हाला नेमकी अडचण का?’, असा सवाल सुप्रीम कोर्टाने पेटाला केला. पेटाला सुप्रीम कोर्टाने याप्रकरणात २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

पेटाचा आक्षेप काय?

PETA India या प्राणी संरक्षण संस्थेने नांदणी (शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठात आणलेल्या माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारा प्रकल्पात नेण्यासाठी याचिका दाखल केली होती. माधुरीला वनतारातून पुन्हा मठात हलवण्याचा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे थेट उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हणणे सादर करण्यात आले होते.

माधुरी हत्तीण कोल्हापूरात परतली, तेव्हा फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. कर्णकर्कश घोषणा देण्यात आल्या. ढोल ताशांचा मोठा आवाज करण्यात आला. आता तिला साखळदंडात बांधून एका शेडमध्ये एकाकी ठेवण्यात आले आहे, असा आक्षेप पेटाचा होता. 33 वर्षांपासून मठात राहिल्यामुळे माधुरीच्या पायांना दुखापत आणि गुडघ्यांना सूज आली. त्यानंतर तिला डांबरी रस्त्यावर चालणे आणि कठीण जागी उभे राहणे असह्य झाले होते, म्हणून तिची रवानगी वनतारामध्ये केल्याचे म्हणणे पेटाने मांडले होते. आता सुप्रीम कोर्टाने पेटाची याचिका फेटाळली आहे.

Follow Us
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं