जत पूर्वच्या गावांमध्ये कर्नाटकमधून ओव्हरफ्लोमुळं पाणी, आता शेतकऱ्यांचं महाराष्ट्र सरकारला साकडं

शंकर देवकुळे

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 5:48 PM

राज्य सरकारने पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारशी अधिकृत सामंजस्य करार केल्यास कोट्यवधी रुपयांच्या खर्चाविना जतच्या 65 गावांचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी मिटू शकतो.

जत पूर्वच्या गावांमध्ये कर्नाटकमधून ओव्हरफ्लोमुळं पाणी, आता शेतकऱ्यांचं महाराष्ट्र सरकारला साकडं
जत पाणी प्रश्न

सांगली: कोणत्याही योजने शिवाय सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न तूर्त तरी मिटला आहे. जिल्ह्यातील जत तालुक्यात कृष्णा नदीचे पाणी शेजारच्या कर्नाटक राज्यातून कृष्णा नदीवरील तुबची-बबलेश्वर योजनेमुळे पाण्याचा ओव्हर फ्लो  होऊन नैसर्गिकरित्या दुष्काळी भागात दाखल होत असल्याने गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळग्रस्तांची तहान भागत आहे.राज्य सरकारने पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारशी अधिकृत सामंजस्य करार केल्यास कोट्यवधी रुपयांच्या खर्चाविना जतच्या 65 गावांचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी मिटू शकतो.

म्हैसाळ योजना पूर्ण नसल्यानं 65 गावांचा प्रश्न कायम

सांगली जिल्ह्यातील जत तालुका म्हणजे दुष्काळी तालुका म्हणून आजही ओळखला जातो.तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी युतीच्या काळात कृष्णा नदीचे पाणी तालुक्याला देण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजना सुरू झाली.मात्र,अद्यापही म्हैसाळ सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही.त्यामुळे आजही 65 गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आणि कायम आहे. गत भाजपा सरकारच्या काळात म्हैसाळ विस्तारित योजना आखण्यात आली. त्याला तत्त्वता मंजुरीही मिळाली.पण कृष्णा लवादामुळे पाण्याच्या प्रश्न याठिकाणी निर्माण झाला.आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वारणा नदीच्या माध्यमातून 6 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हैसाळासाठी 846 कोटींची गरज

म्हैसाळ विस्तारीत योजनेसाठी जरी आज 6 टीएमसी पाणी उपलब्ध झाले असले तरी योजना अजून कागदावर आहे,प्रत्यक्षात ती येण्यासाठी जवळपास 846 कोटींचा आवश्यकता आहे.तसेच ती पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल,हे माहिती नाही.त्यामुळे 65 गावांना प्रत्यक्ष पाणी कधी मिळेल,हा मोठा प्रश्न आहे ? एका बाजूला ही परिस्थिती असताना गेल्या दीड वर्षांपासून जत पूर्व भागातील पाण्याची टंचाई गायब झाल्याची स्थिती आहे. दरवर्षी पूर्व भागातील 65 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सूरु करावे लागत,जवळपास प्रशासनाला 13 ते 17 कोटी यासाठी खर्चही करावा लागत,मात्र दीड वर्षात याठिकाणी एक टँकरची गरज भासली नाही.म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले नसताना,हे सर्व शक्य झाले आहे,ते म्हणजे शेजारच्या कर्नाटकच्या राज्यातील तुबची-बबलेश्वर योजनेमुळे. म्हैसाळ ऐवजी याठिकाणी आता कर्नाटकच्या तुबची-बबलेश्वर सिंचन योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे, अशी माहिती काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी दिलीय.

सामंजस्य करारामुळं जत पूर्वचा पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता

तुबची बबलेश्वर योजनेच्या ओव्हरफ्लो मुळे आणि फुगवट्यामुळं सायफन पद्धतीने दाखल झालेल्या कर्नाटकातील पाण्यामुळे तालुक्यातील मोटेवाडी, तिकोंडी 1,तिकोंड 2 ,भीवर्गी आणि सिद्धनाथ तलाव भरले आहेत.त्यामुळे जवळपास 30 ते 35 गावांचा पाण्याचा प्रश्न तूर्त मिटला आहे.तर या पाण्यामुळे या भागातील भूजल पातळीही वाढली आहे.परिणामी गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळग्रस्तांची तहान भागात आहे, असं पिराप्पा माळी यांनी सांगितलं आहे.

कोणत्याही योजने शिवाय जत तालुक्यात जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पाणी शेजारीच्या कर्नाटक राज्याच्या तुबची-बलेश्ववर योजनेच्या माध्यमातून ओव्हरफ्लो होऊन पोहोचत आहे. हे आता सिद्ध झालं आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारशी कृष्णा लवादातील मानवता धर्मा प्रमाणे पाण्याच्या बदल्यात पाणी हा सामंजस्य करार केल्यास जत तालुक्यातील दुष्काळाचा प्रश्न कायम स्वरूपी मिटू शकतो,अशी धारणा दुष्काळग्रस्त जनतेची आहे.

इतर बातम्या:

NBA सदस्यपदी ‘टीव्ही 9 नेटवर्क’ ची वर्णी, लोकशाहीवादी संस्थेचा भाग झाल्याचा आनंद, सीईओ बरुण दास यांची भावना, अनुराग ठाकूर यांच्यांशी विविध मुद्यांवर चर्चा

उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्याच्या यादीत; प्रविण दरेकर म्हणतात, कशाच्या आधारावर सर्व्हे झाला?

Sangli Jat sixty five villages water need completed by Tubachi Bableshwar scheme of Karnataka with over flow

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI