कोरोनाकाळात 472 टन भाजीपाला, 57 टन धान्याची मदत, कोणतीही देणगी न घेता तुकाराम बाबा महाराजांचे दानयज्ञ !

कोरोना महामारीच्या संकटामध्ये गरजुंना मदत करण्याचे काम जतमधील तुकाराम बाबा महाराज करत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे दानयज्ञ अखंडपणे सुरु आहे.

कोरोनाकाळात 472 टन भाजीपाला, 57 टन धान्याची मदत, कोणतीही देणगी न घेता तुकाराम बाबा महाराजांचे दानयज्ञ !
TUKARAM BABA MAHARAJ
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 7:53 PM

सांगली : कोरोना महामारीच्या संकटामध्ये गरजूंना मदत करण्याचे काम जतमधील तुकाराम बाबा महाराज करत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे हे दानयज्ञ अखंडपणे सुरु असून यामध्ये ते गरजुंना धान्य तसेच पैशांच्या स्वरूपात मदत करत आहेत. तुकाराम बाबा महाराज हे जत येथील चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती आहेत. तसेच ते श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघनेच्या माध्यमातूनही समाजकार्य करतात. (Sangli Jat Tukaram Baba Maharaj helping needy peoples in crisis of Corona epidemic)

भाजीपाला, धान्य किंवा अन्य माध्यमातून मदत

सांगलीमधील जत तालुक्यातील चिकलगी भुयारी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या संकटात गरजूंना मोठी मदत केली आहे. तुकाराम बाबा यांनी संत गाडगेबाबा यांचे शिष्य बागडे महाराज यांच्या प्रेरणेतून समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. याच प्रेरणेतून ते गेल्या दीड वर्षांपासून आपल्या भक्तांच्या समवेत समाजातल्या गोरगरीब, गरजूंना वेगवेगळ्या पातळीवर मदतीचा हात देत आहेत. भाजीपाला, धान्य किंवा अन्य साधन सामग्रीच्या माध्यमातून ते लोकांना जमेल त्या मार्गाने मदत करत आरहेत.

कोणत्याही प्रकारची देणगी न स्वीकारता मदत

मदत पुरवण्याचे त्यांचे हे दानयज्ञ आजही सुरू आहे. आत्तापर्यंत त्यानी जत तालुक्यात 472 टन भाजीपाला, 57 टन धान्य गरजू लोकांना दिले आहे. तसेच त्यांनी हजारोच्या संख्येने सॅनिटायझर आणि मास्क लोकांना पुरवले आहे. याशिवाय काही लोकांना त्यांनी आर्थिक स्वरूपाची मदतदेखील केली आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ही मदत समाजातून कोणत्याही प्रकारची देणगी, दान न घेता केली आहे. स्वतःच्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून त्यांनी ही मदत केली आहे.

ऑर्केस्ट्रा कलाकारांनाही केली मोठी मदत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदीमुळे कलाकारांवरही संक्रांत आली आहे. अशा कलाकारांनादेखील तुकाराम बाबा महाराज यांनी मदतीचा हात दिला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्हयातील लोककलाकारांचे त्यांच्याशी जुने ऋणानुबंध आहेत. याच जाणिवेतून तुकाराम महाराजांकडे करण्यात आलेल्या मागणीनंतर त्यांनी गरजू आणि संकटात असलेल्या आर्केस्ट्रा कलाकारांना धान्याचे वाटप करत त्यांना मदत केली आहे.

इतर बातम्या :

मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची ठगेगिरी; शेलार म्हणतात, ‘कितने आदमी थे’!

मोठी बातमी! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

हा 12 अंकी खास नंबर गमावल्यास थांबू शकते पेन्शन, जाणून घ्या ईपीएफओच्या नियमाबाबत

(Sangli Jat Tukaram Baba Maharaj helping needy peoples in crisis of Corona epidemic)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.