Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात दिवसभरात 287 नवे कोरोनाग्रस्त आढळले, 10 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 12, 2021 | 12:26 AM

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात दिवसभरात 287 नवे कोरोनाग्रस्त आढळले, 10 जणांचा मृत्यू
Corona Update

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 11 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Jul 2021 11:03 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 287 नवे कोरोनाग्रस्त आढळले, 10 जणांचा मृत्यू

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 287 पॅाझिटीव्ह रुग्णांची वाढ.

    – दिवसभरात 228 रुग्णांना डिस्चार्ज.

    – पुण्यात करोनाबाधीत 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 5

    -227 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 481834

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3085

    – एकूण मृत्यू -8652

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6074

  • 11 Jul 2021 09:39 PM (IST)

    नागपूर मनपा केंद्रामध्ये 45 वर्षावरील नागरिकांसाठी सोमवारी कोविशील्ड उपलब्ध

    नागपूर मनपा केंद्रामध्ये 45 वर्षावरील नागरिकांसाठी सोमवारी कोविशील्ड उपलब्ध

    शासनाकडून मर्यादित प्रमाणात कोविशील्ड लसी प्राप्त झाल्यामुळे फक्त 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केंद्रांवर सोमवारी होणार आहे.

    या वयोगटातील नागरिकांना कोविशील्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

    नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोविशील्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत.

  • 11 Jul 2021 07:16 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 7 जण कोरोनामुक्त

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही

    आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    आतापर्यंत 56514 जणांनी केली कोरोनावर मात

    तर सध्या 44 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 11 Jul 2021 06:25 PM (IST)

    नागपुरात आज 16 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 28 जण कोरोनामुक्त

    नागपूर कोरोना अपडेट -

    नागपुरात आज 16 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    28 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या - 477331

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 468157

    एकूण मृत्यूसंख्या - 9034

  • 11 Jul 2021 05:43 PM (IST)

    राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लसीकरण केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी केली मदत

    पुणे : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यातील लासुरणे या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोविड लसीकरण केंद्रावर गेले होते.  त्यावेळी तेथे लस घेण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ होण्याआधीच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः लसीकरण केंद्राच्या दरवाजात उभे राहून रांगेत एक-एक महिलेला पाठवले. तसेच लसीकरण शिस्तीत पार पाडण्यासाठी काही वेळ मदत केली.  सर्वांनी रांगेत येऊनच लस घेण्याचे आवाहन केल्याने लसीकरण केंद्रावर सुरळीतपणा आला.
  • 11 Jul 2021 03:05 PM (IST)

    औरंगाबादेत शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

    औरंगाबाद :-

    शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी

    औरंगाबाद जिल्ह्यातील सावखेड गंगा गावातील घटना

    मारहाणीत सैन्यात नौकरीला असलेला तरुण गंभीर जखमी

    आज सकाळी 11 वाजता घडली घटना

    घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

    जखमी तरुणाला वैजापूरच्या रुग्णालयात केले दाखल

    पाच ते सहा जणांनी मिळून केली जवानाला मारहाण

    शेतीच्या वादातून घडली घटना

  • 11 Jul 2021 03:04 PM (IST)

    सोलापुरातील ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरातील निर्बंध सुरूच राहणार

    सोलापूर-- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरातील निर्बंध सुरूच राहणार

    पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांना मुदतवाढ

    दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार सर्वप्रकारच्या आस्थापना

    दर शनिवार-रविवारी राहणार विकेंड  लॉकडाऊन,

    रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा मात्र सुरूच राहणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

  • 11 Jul 2021 11:03 AM (IST)

    नागपुरात विकेंड लॉकडाऊन, मात्र तरीही नागरिक रस्त्यावर

    नागपूर -

    नागपुरात विकेंड लॉक डाऊन , मात्र नागपूरकर रस्त्यावर

    अत्यावश्यक सेवा वगळता मार्केट बंद

    बाजारपेठा पूर्णतः बंद आहे मात्र रस्त्यावर गर्दी आहे

    रविवार सुट्टी चा दिवस असल्याने नागपूरकर पडले बाहेर

    नागपुरात कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू च प्रमाण कमी

    मात्र तिसरी लाट आणि डेल्टा प्लस चा धोका लक्षात घेता लावण्यात आले निर्बंध

  • 11 Jul 2021 11:02 AM (IST)

    सोलापुरात कोरोना लस मिळत नसल्याने विडी कामगार महिलांचा रस्तारोको

    सोलापूर- कोरोना प्रतिबंधक लस मिळत नसल्याने विडी कामगार महिलांनी केला रस्ता रोको

    लसिचा पुरवठा झाला नसल्याने शहरातील लसीकरण केंद्रावर आज लसीकरण मोहीम आहे बंद

    वारंवार लसीकरण मोहीम ठप्प होत असल्याने विडी कामगार महिलाना मारावे लागत आहे लसीसाठी हेलपाटे

    अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील मुद्रा सन साठी आरोग्य केंद्र समोर कामगार महिलांचा रास्तारोको

    एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता सोलापूर शहरात होत आहे वारंवार लसीकरण मोहीम ठप्प

  • 11 Jul 2021 09:34 AM (IST)

    नवी मुंबईत 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले

    नवी मुंबईत 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले

    रुग्ण संख्या वाढत असल्याने घेण्यात आला निर्णय

    मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शनिवारी आदेश काढून निर्बंध वाढविले

    नियमांचं पालन करण्याचे महानगरपालिकेने केले आवाहन

  • 11 Jul 2021 08:23 AM (IST)

    कोल्हापुरात कोरोनामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेत खळबळ

    कोल्हापूर :

    कोरोनामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

    गडहिंग्लज तालुक्यातील नूल इथंली घटना

    कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात सुरू होते उपचार

    कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच जिल्ह्यात इतक्या कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू

    आरोग्य यंत्रणेत खळबळ,

    तिसऱ्या लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं सांगितलं जातं असतानाच घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी पालक हेच चिंतेत

  • 11 Jul 2021 08:19 AM (IST)

    पुणे शहरात आज लसीकरण बंद राहणार

    पुणे-

    - शहरातील लसीकरण आज बंद राहणार,

    - महापालिका प्रशासनाला शनिवारी ३४ हजार १०० डोस मिळाले होते, त्याद्वारे १९० केंद्रांवर लसीकरण करण्यात आले,

    - महापालिकेकडे लस शिल्लक असली तरी प्रशासकीय सोईसाठी दर रविवारी लसीकरण केंद्रांना सुट्टी देण्याचा प्रशासनाचा निर्णय,

    - यापूर्वी शनिवारी ५० टक्के व रविवारी ५० टक्के लसीकरण केंद्र सुरू ठेवले जात होते,

    - त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील डॉक्टर व इतर कर्मचारी यांना एक दिवस सुट्टी मिळत होती,

    - तर नागरिकांना आठवड्याचे सर्व दिवस लस उपलब्ध होत होती.

  • 11 Jul 2021 08:15 AM (IST)

    औरंगाबाद शहरात लसीकरण बंद, लसींचा साठा संपला

    औरंगाबाद :-

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा लसींचा साठा संपला

    एकाच दिवसात संपला सहा हजार लसींचा साठा

    आज पुन्हा बंद राहणार लसीकरण मोहीम

    फक्त दोन आरोग्य केंद्रावर मिळणार 400 नागरिकांना लस

    सातत्याने लस तुटवडा होत असल्यामुळे औरंगाबादकर नागरिक हैराण

  • 11 Jul 2021 07:23 AM (IST)

    नाशिक शहरातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद, लसीचा साठा संपला

    नाशिक

    - आज रविवार असल्याने नाशिक शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद - को वॅक्सिंनचे फक्त 8 हजार डोस शिल्लक,कोविशिल्डचा लस साठा पूर्णपणे संपला - नागरिकांचा लस घेण्यासाठी चांगला प्रतिसाद असताना लस साठा संपल्याने नाराजी - आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 12 लाखाहून अधिक नागरिकांच झालं लसीकरण

  • 11 Jul 2021 07:18 AM (IST)

    नागपुरात दहा दिवसांत केवळ 1 लाख 37 हजार नागरिकांचे लसीकरण

    नागपूर - नागपुरात गेल्या दहा दिवसांत 1 लाख 37 हजार नागरिकांचंच झालं लसीकरण

    यातील 2 दिवस आकडा 30 हजार च्या पुढे गेला मात्र आठ दिवसात दर दिवशी 5 हजार पेक्षा ही कमी नागरिकांचं लसीकरण झालं

    प्रशासन गंभीर नसल्याचं चित्र

    तिसरी लाट आणि डेल्टा प्लस चा धोका वर्तविण्यात येत असताना लसीकरणाला गती मिळत नाही

    यामुळे चिंता वाढण्याची शक्यता

    नागपुरात कोरोना चा सध्या पॉझिटिव्हीटी रेट 0.41 टक्के वर

  • 11 Jul 2021 07:16 AM (IST)

    नागपुरात आता कोरोनासोबत डेंग्यूचे नवे संकट, शहरातील 170 जणांना बाधा

    नागपूर - नागपुरात आता कोरोना सोबतच डेंगू च नवं संकट

    शहरात 170 रुग्णांना झाली डेंगू ची बाधा

    आरोग्य यंत्राने पुढे नवी चिंता

    कोरोना च संकट कमी होत असताना आता पावसाळ्यात डेंगू ने डोकं वर काढलं त्यामुळे प्रशासनाला नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे

    मे महिन्यात डेंगू चे केवळ 12 रुग्ण होते ते आता 170 वर पोहचले

    डेंगू पासून रक्षण करण्यासाठी स्वच्छता पाळण्याचे आरोग्य यंत्रणेच आवाहन

  • 11 Jul 2021 07:11 AM (IST)

    नागपुरातील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा, ते 11 नमुने डेल्टा प्लसचे नाहीत

    नागपूर -

    नागपुरातील ते 11 नमुने डेल्टा प्लसचे नाहीत

    11 जणांचे डेल्टा प्लस संशयित म्हणून नमुने तपासणी साठी हैद्राबाद ला पाठविण्यात आले होते

    त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ते डेल्टा प्लस चे नसल्याचं झालं स्पष्ट

    आरोग्य यंत्रणेला मिळाला दिलासा

    कोल्हापूर वरून आलेले दोन आणि शहरातील 9 असे 11 जणांचे नमुने डेल्टा प्लस च्या संशयावरून निरी कडे पाठविण्यात आले होते

    निरीने ते हैद्राबादला पाठविले

    त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ते डेल्टा प्लस चे रुग्ण नसल्याचं आलं समोर

Published On - Jul 11,2021 6:57 AM

Follow us
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.