गौतमी पाटील हिच्या खरंच वर्षभराच्या तारखा बूक? पाहा नेमकं काय म्हणाली

गौतमी पाटील हिच्या वर्षभराच्या तारखा बुक असल्याची चर्चा सर्वत्र असते. पण खरंच तिच्या कार्यक्रमासाठीच्या वर्षभराच्या तारखा बूक आहेत का? या विषयी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर गौतमी पाटीलने आपलं स्पष्ट मत मांडलं.

गौतमी पाटील हिच्या खरंच वर्षभराच्या तारखा बूक? पाहा नेमकं काय म्हणाली
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 10:19 PM

मुंबई : डान्सर गौतमी पाटील हिची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतेय. गौतमीच्या कार्यक्रमाला जाता यावं म्हणून एसटी महामंडळात काम करणाऱ्या तरुणाने रजेसाठी अर्ज केलेलं पत्रही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला हजारो तरुणांची गर्दी होतेय. गौतमी पाटील हिची प्रसिद्धी जशी वाढतेय तशा तिच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा देखील पसरत आहेत. नुकतंच गौतमी पाटील ही काही लाख रुपये एका कार्यक्रमासाठी घेत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावर गौतमी पाटीलने स्पष्टीकरण दिलेलं. आता गौतमी पाटील हिच्या वर्षभराच्या कार्यक्रमाच्या तारखा बुक असल्याच्या चर्चा रंगत आहे. यावरही गौतमीने स्पष्टीकरण दिलं आहे.

गौतमी पाटीलने आज ‘टीव्ही 9 मराठी’सोबत खास बातचित केली. यावेळी तिने विविध प्रश्नांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. तिला यावेळी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. तिच्या वर्षभराच्या तारखा बूक आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने नाही, असं उत्तर दिलं. “माझ्या कार्यक्रमासाठी वर्षभराच्या तारख्या बूक नाही. फक्त एवढ्या महिन्याच्या तारखा बूक आहेत. पुढच्या महिन्याच्या तारखा खाली आहेत”, असं गौतमीने सांगितलं.

बार्शीत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

दरम्यान, गौतमी पाटील हिच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली. यावरही गौतमीने प्रतिक्रिया दिली. “मी वेळेत पोहोचले होते. आजपर्यंत असं घडलं नाहीय की, लेट गेले आणि उशिराने कार्यक्रम सुरु झालाय. मी वेळेत पोहोचले होते. मला दहा वाजेपर्यंत परवानगी असते. माझ्या कार्यक्रमाला पोलीस असतात. त्यांची साथ असते. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला ऐकावं लागणार. ते मला म्हटले दहाला कार्यक्रम बंद करा. तर मी दहा वाजता कार्यक्रम बंद करणारच आहे. याबाबत मी सविस्तर माहिती घेऊन आपल्याशी बोलेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.

हे सुद्धा वाचा

“प्रेक्षकांचं प्रेम आहे. मला संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतोय. या गोष्टीचं खूप छान वाटतंय. मी इतकंच म्हणते की, असंच प्रेम कायम राहूद्या. आमच्या कार्यक्रमात आता महिला वर्गही यायला लागला आहे. त्यामुळे जास्त छान वाटतं”, असं गौतमी पाटील म्हणाली. “प्रेक्षकांनीच मला प्रेम दिलं आहे. सबसे पाटील गौतमी पाटील असं मला प्रेक्षकांनीच नाव दिलं आहे. त्यांनी मला इथपर्यंत आणलं, हे त्यांचेच उपकार आहेत”, असं गौतमी पाटील म्हणाली. दरम्यान, बार्शीतल्या प्रकरणावर पुन्हा प्रश्न विचारण्यात आला असता, “मी वेळेत पोहोचले होते. पण मी जास्त बोलू शकत नाही. कारण मी पूर्ण माहिती घेतलेली नाही. मी सगळा विषय जाणून घेईन”, असं गौतमी पाटीलने सांगितलं.

लग्न कधी करणार?

“अजून लवकर लग्न करणार नाही. कारण आताच सुरुवात झालीय. एवढ्या लवकर लग्न करणार नाही. ज्यावेळेस लग्न ठरेल आणि करायचा विचार करेन त्यावेळी तुम्हाला नक्की सांगेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.

उदयनराजेंची भेट का घेतली?

गौतमीने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीवरही गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली. “उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादासाठी त्यांना भेटले. त्यांना दोन मिनिटे भेटले आणि कार्यक्रमाला आले”, असं गौतमीने सांगितलं.

गौतमी पाटील हिचं प्रेक्षकांना आवाहन

मला कुठल्याही राजकारणात यायचं नाही. मी कलाकार आहे. मी माझी कला सादर करत असणार आहे, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी दिली. यावेळी गौतमीने प्रेक्षकांनाही महत्त्वाचं आवाहन केलं. “माझं एवढंच सांगणं आहे की, तुम्ही एवढ्या लांबून माझ्या कार्यक्रमाला येत असतात, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक कार्यक्रमाला वाद होत नाहीत. थोडंफार होतं. पण ते पुढे वाढवलं जातं. त्यामुळे काहीतरी चर्चा होते. कार्यक्रमाला या, कार्यक्रम इन्जॉय करा”, असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.