पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, नांदेड विद्यापाठीच्या ऑनलाईन परीक्षेचा बोजवारा, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

नांदेड विद्यापीठाने पाठवलेल्या ऑनलाईन परीक्षा लिंक ओपन न झाल्याने विद्यार्थी दिवसभर हैरान होते. विद्यापीठाच्या नियोजन शून्य आणि ढिसाळ कारभारामुळे मुखेड तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागले आहे.

पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, नांदेड विद्यापाठीच्या ऑनलाईन परीक्षेचा बोजवारा, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या (Swami ramanand Tirth Nanded University) उन्हाळी 2021 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा कालपासून म्हणजेच 13 जुलैपासून सुरु झाल्या.  मात्र विद्यापीठाने पाठवलेल्या ऑनलाईन परीक्षा लिंक ओपन न झाल्याने विद्यार्थी दिवसभर हैरान होते. पहिल्यात दिवशी हजारो विद्यार्थी परीक्षेवाचून वंचित राहिले आहेत. नांदेड विद्यापीठाचा नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभार पाहायला मिळाला. अखेर विद्यापाठीवर परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. विद्यापाठीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व्हर प्रॉब्लेम, लिंकच ओपन होईना

परीक्षा देण्यासाठी गाव कुसाबाहेर, शेतात व शहरात जाऊन सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत उपाशी राहून विद्यापीठाने पाठवलेली लिंक ओपन होण्याची विदयार्थी केविलवाणी वाट पाहत होते. मात्र दिवसभर लिंक ओपन न होता लिंकवर सर्वरचा प्रॉब्लेम येत असल्याने विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. तर ऑनलाईन परिक्षेचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला.

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर होणार

यामध्ये पदवी पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या 20 जुलै 26 जुलै पासून सुरू होण्याचा होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ही पुढे ढकलण्यात आल्या आहेत सुधारित वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल.

महाविद्यालय स्तरावर क्लस्टर पद्धतीने होणार्‍या परीक्षेच्या तारखेत बदल नाही

परंतु महाविद्यालय स्तरावर क्लस्टर पद्धतीने होणार्‍या परीक्षेच्या तारखेत आणि वेळेत कुठलाही बदल नाही, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विद्यापीठ समितीचे संचालक डॉक्टर रवी सरोदे यांनी दिली आहे.

(Server problem, link not open, Swami ramanand Tirth Nanded university online exam)

हे ही वाचा :

पावसाने ओढ दिल्याने पांढऱ्या सोन्याच्या पेरणीत घट, कपाशीचं क्षेत्र घटण्याची भीती

नांदेडमध्ये लसीकरणाला वेग, आतापर्यंत 7 लाख ‘लसवंत’, 25 लाखांचं जिल्हाधिकाऱ्यांचं उदिष्ट