AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धेश्वर एक्सप्रेस पुन्हा रुळावर, 1 जुलैपासून प्रवाशांच्या सेवेत!

सिद्धेश्वर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कोरोना काळात बंद झालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस येत्या एक जुलैपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. (Siddheshwar Express restart From 1 july Decision Railway)

सिद्धेश्वर एक्सप्रेस पुन्हा रुळावर, 1 जुलैपासून प्रवाशांच्या सेवेत!
मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला सर्वप्रथम IRCTC च्या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. त्याठिकाणी व्हेरिफिकेशन विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये ईमेल आणि मोबाईल क्रमांक टाकावा. याठिकाणी असलेल्या एडिट ऑप्शनचा वापर करुन तुम्ही ईमेल आणि मोबाईल क्रमांकाचा तपशील बदलू शकता.
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 10:22 AM
Share

सोलापूर : सिद्धेश्वर एक्सप्रेसने (Siddheshwar Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कोरोना काळात बंद झालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस येत्या एक जुलैपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. रेल्वे विभागाने येत्या 1 जुलैपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. (Siddheshwar Express restart From 1 july Decision Railway)

तीस विशेष एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू करण्याचा रेल्वेचा निर्णय

सोलापूर विभागातून धावणाऱ्या तीस विशेष एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू करण्याचा रेल्वे विभागाने निर्णय घेतला आहे. यामध्ये सिद्धेश्वर एक्सप्रेसचाही समावेश करण्यात आलेला आहे. येत्या एक जुलैपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस पुन्हा रुळावर धावावर आहे.

सिद्धेश्वर एक्सप्रेस पुन्हा ‘रुळावर’

सोलापूर-मुंबई या मार्गावर सिद्धेश्वर एक्सप्रेस धावते. सोलापूरवरुन हजारो नागरिकांची आपल्या कामानिमित्त राजधानी मुंबईला ये जा असते. तसंच मुंबईमधूनही सोलापूरला येणारे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. या सर्व प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने चांगली बातमी दिली आहे. सोलापूर-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेसेवेचा फायदा होईल.

कोणकोणत्या गाड्या सुरु होणार

सोलापूर विभागातून धावणाऱ्या तीस विशेष एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू करण्याचा रेल्वे विभागाने निर्णय घेतला आहे. नव्याने सुरू होणार्‍या अन्याय गाड्यांमध्ये पुणे नागपूर पुणे विशेष एक्सप्रेस, मुंबई लातूर मुंबई विशेष एक्सप्रेस, सोलापूर मुंबई सोलापूर या गाड्यांचा समावेश आहे.

इंद्रायणीसह 11 रेल्वे जुलै महिन्यापासून सुरु होणार आहे. मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. तर जनशताब्दी एक्स्प्रेसही लवकरच सुरु होणार आहे.

(Siddheshwar Express restart From 1 july Decision Railway)

हे ही वाचा :

Indrayani Express | इंद्रायणीसह 11 रेल्वे जुलै महिन्यापासून सुरु होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.