सिंधुदुर्गामध्ये 26 हजार लसींचा पुरवठा, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 26 हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकराने हा लसींचा पुरवठा केला आहे.

सिंधुदुर्गामध्ये 26 हजार लसींचा पुरवठा, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 10:02 PM

सिंधुदुर्ग : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 26 हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकराने हा लसींचा पुरवठा केला आहे. यामध्ये कोविशिल्डचे 20 हजार व कोव्हॅक्सीनच्या 6 हजार डोस आहेत. (Sindhudurg district receive 26000 covid vaccines through Maharashtra state government information given by Vaibhav Naik)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करण्यावर भर

गणेश चतुर्थी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतात. परंतु कोरोनाचे संकट कायम असल्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भर आहे.

जिल्ह्यासाठी 26 हजार कोरोना लसींचा पुरवठा

मागील आठवड्यात सिंधुदुर्गसाठी 20 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला होता. तसेच चार दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी 21 हजार लसी पुरविण्यात आल्या होत्या. आता पुन्हा जिल्ह्यासाठी 26 हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त गर्दी होण्याची शक्यता

मिळालेल्या या लसीमुळे जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. गणेश चतुर्थीनिमित्त या भागात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. राज्य सरकारने पुरवलेल्या 26 हजार लसींमुळे लसीकरण मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.

इतर बातम्या :

Zydus Cadila ZyCoV-D Vaccine | भारताच्या आणखी एका स्वदेशी लसीला मंजुरी, आता 12 वर्षावरील सर्वांना लस मिळणार

IAS Transfer : निधी चौधरींची मुंबईच्या आयटी संचालकपदी नियुक्ती, रायगडचे नवे जिल्हाधिकारी कोण?

गोपीचंद पडळकर यांनी करुन दाखवलं, आता सरकार अ‌ॅक्शन मोडमध्ये, बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे गुन्हा दाखल

(Sindhudurg district receive 26000 covid vaccines through Maharashtra state government information given by Vaibhav Naik)