53 गावात एकच गणपती, रक्तदान शिबीर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासह अनेक कार्यक्रम, भूम पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम पोलीस स्टेशनने आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. भूम तालुक्यातील 53 गावाचा व 46 गणेश मंडळाचा एकच गणपती भूम पोलीस ठाण्याच्या आवारात बसविण्यात आला आहे.

53 गावात एकच गणपती, रक्तदान शिबीर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासह अनेक कार्यक्रम, भूम पोलिसांचा स्तुत्य उपक्रम
भूम पोलिस

उस्मानाबाद : जिल्ह्यातील भूम पोलीस स्टेशनने आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. भूम तालुक्यातील 53 गावाचा व 46 गणेश मंडळाचा एकच गणपती भूम पोलीस ठाण्याच्या आवारात बसविण्यात आला आहे. कोरोनाचे संकट व गणेशोत्सव काळात हेवेदावेतून होनारे वादविवादवर तोडगा काढत भूम पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे.

53 गावात एकच गणपती

गेली 2 वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने अनेक सण उत्सव साजरे करायला मर्यादा आल्या आहेत , यंदाच्या गणेशोत्सवला देखील मर्यादा आल्या यातुन मार्ग काढत कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनी 53 गावातील व 46 गणेश मंडळाचा एकच गणपती बसविण्याचा निर्णय घेतला व त्याला पंचक्रोशीतून प्रतिसाद लाभला.

रक्तदान शिबीर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

रक्ताचा तुटवडा लक्षात घेता पोलिसांनी रक्तदान शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे उपक्रम राबविले, रक्तदान केलेल्या तरुणांना पोलिसांनी हेल्मेट व स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाटप केली. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेसाठी कष्ट घेतले.

भूम पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

पोलिसांनी बसविलेल्या गणपतीला नागरिक, तरुणांतून उत्स्फूर्तपणे सहभाग असून गावोगावी मंडळे नसल्याने गावतही गर्दी कमी आहे. त्यामुळे निश्चित कोरोनाला आळा बसेल, असं बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी सांगितले. गणेशोत्सव हा सार्वजनिक सण असला तरी सध्या कोरोनाचे संकट कायम आहे, गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो मात्र भूम पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे.

आज गणेश विसर्जनाची धामधूक

प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. आज अखेर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

हे ही वाचा :

Ganesh Visarjan 2021 Live Update | लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI