Solapur School Reopen: सोलापुरात 20 टक्के शिक्षकांचा दुसरा डोस प्रलंबित, जिल्ह्यात 211 शाळा सुरु

राज्य सरकारनं ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणं सोलापूर जिल्ह्यातही शाळांचे वर्ग सुरु झाले आहेत.

Solapur School Reopen: सोलापुरात 20 टक्के शिक्षकांचा दुसरा डोस प्रलंबित, जिल्ह्यात 211 शाळा सुरु
प्रातिनिधिक फोटो

सोलापूर: राज्य सरकारनं ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणं सोलापूर जिल्ह्यातही शाळांचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, सोलापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 20 टक्के शिक्षकांचे दुसऱ्या डोसचे कोरोना लसीकरण झालेले नाही, त्यासोबत काही शिक्षकांची कोरोना चाचणी देखील झालेली नसल्याचं कळतंय.

आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू

सोलापूरमध्ये आतापर्यंत 80 टक्के शिक्षकांचे लसीकरण त   20 टक्के शिक्षकांचा दुसरा डोस राहिला शिल्लक राहिलेलाल आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांना लसीकरण करणे आवश्यक करण्यात आलेलं आहे. सोलापूरच्या 80  टक्के शिक्षकांनी दोन डोस घेऊन शाळा गाठली आहे. 20 टक्के शिक्षकांना दुसरा डोस मिळाला नाही तरीही त्यांनी केली शाळेला जायला सुरुवात केली आहे. तर, काही शाळांमध्ये कोरोना  तपासणी न करता  शिक्षक वर्गावर जात असल्याची माहिती आहे.

शनिवारपर्यंत 59747 शाळा उघडल्या

15 जुलै रोजी सोलापूरमधील 211 शाळा सुरु झाल्या होत्या. तर, 12345 विद्यार्थी जिल्हाभरातील शाळांमध्ये दाखल झाले होते. राज्यात एकूण शाळांची संख्या 19997 असून त्यापैकी 5947 शाळा उघडण्यात आल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची एकूण संख्या 45,07,445 असून त्यापैकी 4,16,599 विद्यार्थ्यांनी शाळेत आपली हजेरी नोंदवली, असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

नियमांचं पालन करणं आवश्यक

कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावं, असं शासनानं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.

1) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे; शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.

Thermometer, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची – स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी. वापरण्यात येणारे thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.

• एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.

. क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.

2) शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी: संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- १९ साठीची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करावी.

3) बैठक व्यवस्था : वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.

इतर बातम्या:

मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

भारतात केवळ 22 टक्के शाळांकडेच इंटरनेट सुविधा, शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतूनच उघड

Solapur school reopen twenty percent teachers not get second dose of corona vaccine but started their work

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI