Tadoba Tourism : चंद्रपुरातील ताडोबा पर्यटन उद्यापासून बंद, पावसामुळं कोअर झोनमध्ये भ्रमंती करता येणार नाही

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या एक जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वर्षभरात सुमारे 1 लाख 94 हजारांहून जास्त पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

Tadoba Tourism : चंद्रपुरातील ताडोबा पर्यटन उद्यापासून बंद, पावसामुळं कोअर झोनमध्ये भ्रमंती करता येणार नाही
चंद्रपुरातील ताडोबा पर्यटन उद्यापासून बंद
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 9:22 PM

चंद्रपूर : जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात व्याघ्रसफारी करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात सुमारे तीन महिने ताडोबा प्रकल्प पर्यटनासाठी बंद असतो. यंदाही 1 जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद राहणार आहे. 1 जुलैपासूनची कोअर क्षेत्राची (Core area) ऑनलाइन बुकिंग (online booking) बंद करण्यात आली आहे. हमखास व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे पर्यटनासाठी येत असतात. जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती (Forest trekking) करणे कठीण असते. त्यामुळे ताडोबाचा कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो.

मार्च ते मे 80 हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी

यंदाही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या एक जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वर्षभरात सुमारे 1 लाख 94 हजारांहून जास्त पर्यटकांनी हजेरी लावली आहे. तर मार्च ते मे 2022 दरम्यान सुमारे 80 हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. पावसाळ्यामुळे दरवर्षी कोअर झोन बंद करण्यात येते. यंदाही बफर झोनचे 15 ही दरवाजे पर्यटनासाठी सुरू राहणार आहे. अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

कोअर झोनमधील रस्ते खराब

ताडोबा म्हटलं की हमखास वाघ दिसणार, याची शास्वती. त्यामुळं पर्यटक ताडोबा अंधांरी व्याघ्रप्रकल्पाला भेट देतात. वाघांना आजूबाजूच्या परिसरातही वावर असतो. या वाघांमुळं नेहमी कुणाचा ना कुणाचा तरी बळी जात असतो. वनविभाग उपाययोजना करण्याचा प्रयत्न करते. काही वाघ, बिबट्यांना जेरबंद करते. हे असचं सुरू असते. पण, पर्यटकांना कोअर झोनबाहेरही वाघाचं दर्शन होत असल्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. आता पावसाळ्यात जंगलातील रस्ते खराब झालेले असतात. गाड्या आतमध्ये व्यवस्थित जाऊ शकत नाही. त्यामुळं दरवर्षी पावसाळ्यात ताडोबातील पर्यटन कोअर झोनमधील बंद असतं. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.