Sharad Pawar: त्यांचा चेहराही सांगत होता, देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीवर पवारांचं बोट, आदेश पाळण्याचे फडणवीसांचे संस्कार

शरद पवार म्हणाले, सरळ गोष्ट आहे. माझ्या माहितीनुसार ही दोन नंबरची जागा त्यांनी आनंदाने स्वीकारली असेल असं दिसत नाही. त्यांचा चेहराही सागंत होता. पण ते नाखूश आहेत. आणि नागपूरमध्ये त्यांनी स्वंयसेवक म्हणून काम केलं. तिथे आदेश आल्यानंतर तो पाळायचा असतो. कदाचित असे संस्कार त्यांच्यावर असावे.

Sharad Pawar: त्यांचा चेहराही सांगत होता, देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीवर पवारांचं बोट, आदेश पाळण्याचे फडणवीसांचे संस्कार
देवेंद्र फडणवीस, शरद पवार
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 8:55 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाशी शपथ घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मुशीत वाढले. आदेश पाळण्याचे त्यांचे संस्कार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा बरचं काही सांगून जातो. देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीवर शरद पवार यांनी बोट ठेवलं. शरद पवार म्हणाले, भाजपमध्ये (BJP) दिल्लीचा आदेश (Delhi Order) आला किंवा नागपूरचा (Nagpur) आदेश आला तर त्यात तडजोड नसते. त्यामुळे आदेश आला. त्याचा परिणाम मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदेंवर पडली. त्याची कल्पना कुणाला नव्हती. शिंदेंनाही कदाचित नसेल. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधानी राहावं लागलं.

सत्तेची कोणतीही संधी स्वीकारायची असते

शरद पवार म्हणाले, कार्यपद्धतीत आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावं लागतो. त्याचं उत्तम उदाहरण जे मुख्यमंत्री होते. पाच वर्षे काम केलं. नंतर विरोधी पक्षाचं नेतृत्व केलं. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश दिला. सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते. याचं उदाहरण फडणवीसांनी आज घालून दिलं आहे. या दोन्ही गोष्टी आम्हाला कुणाला माहीत नव्हत्या. पण असं घडलं. तर ते अंमलात येतं आणि ते येईल ते अंमलात येण्यासाठी कोणी नकार किंवा प्रतिक्रिया देईल असं वाटलं नव्हतं. पण ते खरं ठरलं, असंही त्यांनी सांगितलं.

नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली असेल असं नाही

शरद पवार म्हणाले, सरळ गोष्ट आहे. माझ्या माहितीनुसार ही दोन नंबरची जागा त्यांनी आनंदाने स्वीकारली असेल असं दिसत नाही. त्यांचा चेहराही सागंत होता. पण ते नाखूश आहेत. आणि नागपूरमध्ये त्यांनी स्वंयसेवक म्हणून काम केलं. तिथे आदेश आल्यानंतर तो पाळायचा असतो. कदाचित असे संस्कार त्यांच्यावर असावे. त्याचा हा परिणाम असावा, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. फोन करून शुभेच्छा दिल्याचं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.