AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangamner Crime : धक्कादायक ! विहिरीत आढळले आईसह तीन मुलांचे मृतदेह, घातपात की आत्महत्या ?

दुपारी साडेबाराच्या दरम्यान मयत महिला स्वाती ढेकरे हिने सासऱ्यांना शेतावर प्यायला पाणी नेऊन दिले आणि ती पुन्हा घरी आली. त्यानंतर बराच कालावधी उलटला मुलं बाहेर खेळताना दिसली नाही. मुलांचा आरडाओरडाही ऐकून येत नव्हता. म्हणून महिलेचे सासरे घरी आले मुले कुठे गेली हे पहायला आले.

Sangamner Crime : धक्कादायक ! विहिरीत आढळले आईसह तीन मुलांचे मृतदेह, घातपात की आत्महत्या ?
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 9:56 PM
Share

अहमदनगर : विहिरीत आईसह तीन मुलांचे मृतदेह (Deathbody) आढळून आल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात पठार भागात कोठे खुर्द गावात शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेची घारगाव पोलिसां (Ghargaon Police)ना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत चारही मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह शवविच्छेदना (Postmortem)साठी संगमनेर कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे खांडगेदरा व कोठे खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये आई, दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. स्वाती ढोकरे (28 वर्ष), भाग्यश्री ढोकरे (5 वर्ष), तन्वी ढोकरे (साडेतीन वर्षे) आणि चिमुकला मुलगा शिवम (सहा महिने) अशी मयतांची नावे आहेत. (The bodies of three children, including a mother, were found in a well in Sangamner)

काय आहे नेमके प्रकरण ?

कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे हे आपल्या पत्नी, तीन मुले, आई, वडिल यांच्यासह राहत होते. ढोकरे कुटुंबीय शेतकरी आहे. बाळासाहेब ढोकरे हे आपल्या आईसह एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. तर बाळासाहेबांचे वडिल घराजवळच असलेल्या शेतात काम करीत होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान मयत महिला स्वाती ढेकरे हिने सासऱ्यांना शेतावर प्यायला पाणी नेऊन दिले आणि ती पुन्हा घरी आली. त्यानंतर बराच कालावधी उलटला मुलं बाहेर खेळताना दिसली नाही. मुलांचा आरडाओरडाही ऐकून येत नव्हता. म्हणून महिलेचे सासरे घरी आले मुले कुठे गेली हे पहायला आले.

मात्र घरात सूनबाई, मुले कुणीही दिसली नाहीत. सासऱ्यांनी घराच्या आजूबाजूलाही शोध घेतला. मात्र हे चौघेही कुठेच दिसेनात म्हणून सासरे शोधत शोधत घराच्या जवळच असलेल्या विहिरीजवळ गेले. तेथे विहिरीजवळ त्यांना या चौघांच्या चपला दिसल्या. त्यामुळे सासऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी जवळच शेतावर काम करत असलेल्या आपल्या चुलत भावाला हाका मारल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून इतर लोकही धावत आले. त्यानंतर त्यांनी सूनबाई आणि मुलं कुठेही दिसत नसल्याचे सर्वांना सांगितले. मात्र त्यांच्या चपला विहिरीजवळ पाहून सर्वांनी त्यांचा विहिरीत शोध घेतला असता चारही मृतदेह विहिरीत आढळले.

घातपात की आत्महत्या ?

दरम्यान तात्काळ या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी घारगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. हा घातपात आहे की आत्महत्या हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल. (The bodies of three children, including a mother, were found in a well in Sangamner)

इतर बातम्या

Supreme Court : रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालत असाल तर सावध व्हा… ; सुप्रीम कोर्टाने घेतला हा निर्णय

Delhi Crime : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केला, वाचा दिल्लीत काय घडले ?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.