AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खा मराठवाडा दुष्काळात, पण हे दोन तालुके वगळले, राजकीय वातावरण तापताच अशोक चव्हाण म्हणाले, ‘उकसवू नका’

Ashok Chavan on Marathwada Dry Drought: अख्खा मराठवाडा दुष्काळात आला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या तालुक्यांच्या यादीत या विभागातील केवळ दोन तालुके वगळले गेले आहे. भाजप आमदाराच्या मतदारसंघातील दोन तालुके वगळल्याने आता राजकीय वातावरण तापले आहे.

अख्खा मराठवाडा दुष्काळात, पण हे दोन तालुके वगळले, राजकीय वातावरण तापताच अशोक चव्हाण म्हणाले, 'उकसवू नका'
अशोक चव्हाण, मुदखेड, मुखेड तालुका
| Updated on: Sep 27, 2026 | 12:00 PM
Share

नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर,पण मुदखेड आणि मुखेड तालुके वगळल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. मुदखेडमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दुष्काळी यादीची होळी करत सरकारचा निषेध केला. भाजपच्याच दोन आमदारांच्या मतदारसंघातील दोन तालुके दुष्काळी यादीतून वगळले त्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांचे समाज माध्यमावर व्हिडिओ टाकून स्पष्टीकरण दिले. पण अख्खा मराठवाडा दुष्काळग्रस्त असताना नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके का वगळले गेले यावरून वातावरण तापले आहे.

शेतकऱ्यांना उकसवू नका

मुदखेड आणि मुखेड तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. विरोधकांनी आता उद्योग सुरू केलेत, गायब झालेले बिळातून बाहेर येत आहेत- अशोक चव्हाण यांची होळी करणाऱ्या काँग्रेसवर टीका केली आहे. विरोधक लोकांना उकसवण्याचे काम करत आहेत, त्यांच्या नादी लागू नका, असे आवाहन अशोक चव्हाण यांचे शेतकऱ्यांना केले आहे.

पालकमंत्री अतुल सावे नांदेडच्या दौऱ्यावर

पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेडमध्ये दुष्काळी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. हदगाव तालुक्यातील मनाठा पाटी परिसरात पाहणी केली. सोयाबीन पिकाची अतुल सावे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत, तूर कापूस हिरवा दिसत असला तरी उंची घटली, परिणामी माल ही लागतं नाही. आता वर्ष कस काढावं अशी व्यथा महिला शेतकऱ्याने मांडली.

आदित्य ठाकरे जालना जिल्हा दौऱ्यावर

माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील सोबत असणार आहेत. दुष्काळग्रस्त भागात जाऊन करणार पिकांची पाहणी तर शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधणार आहेत . सकाळी 11 वाजता परतुर तालुक्यातल्या वरफळ गावात आदित्य ठाकरे पिकांची पाहणी करतील .तर दुपारी 1 वाजता जालना तालुक्यातल्या रामनगर या ठिकाणी आदित्य ठाकरे पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर