VIDEO : अबब…घोड्याची किंमत तब्बल 5 कोटी, जाणून घ्या घोडाबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडबद्दल!

| Updated on: Dec 23, 2021 | 3:19 PM

कोरोनामुळे यंदाही महाराष्ट्रामधील जवळपास सर्वच यात्रा प्रशासनाने रद्द केल्या आहेत. मात्र, सारंगखेडा येथील यात्रा रद्द करून घोडे बाजाराला मात्र, परवानगी देण्यात आली आहे. 400 वर्षांची परंपरा सारंगखेड्याच्या घोडा बाजाराला आहे. सारंगखेडा येथे एकमुखी दत्त मंदिर आहे.

VIDEO : अबब...घोड्याची किंमत तब्बल 5 कोटी, जाणून घ्या घोडाबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडबद्दल!
5 कोटी घोड्याची किंमत
Follow us on

मुंबई : कोरोनामुळे यंदाही महाराष्ट्रामधील जवळपास सर्वच यात्रा प्रशासनाने रद्द केल्या आहेत. सारंगखेडा (Sarangkhed) येथील यात्रा रद्द करून घोडे बाजाराला मात्र, परवानगी देण्यात आली आहे. जवळपास 400 वर्षांची परंपरा सारंगखेड्याच्या घोडा बाजाराला (Horse market) आहे. सारंगखेडा येथे एकमुखी दत्त मंदिर आहे. हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. त्यामुळे या यात्रेचे विशेष महत्त्व आहे.

घोडाबाजारातील घोड्याची किंमत तब्बल 5 कोटी

या यात्रेच्या निमित्ताने सारंगखेडा येथे भरणारा घोडाबाजार भारतभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी जातिवंत आणि उमदे घोडे या बाजारात विक्रीसाठी येत येतात. विशेष म्हणजे घोडे बाजाराच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल या यात्रेत होते. देशातील प्रसिद्ध सारंगखेड्याच्या अश्व मेळ्यात अलेक्सनंतर चर्चा सुरु झाली आहे, ती रावण या अश्वाची. रावण देखील रुबाबदार आणि जातिवंत घोडा आहे. त्याची चाल आणि रुबाब चांगल्या चांगल्या अश्व प्रेमींना भुरळ घालतोय. रावण मारवाड प्रजातीचा अश्व असून त्याला दररोज दूध, हरभरे, गावरान तूप, अंडी, सुका मेवा खाऊ घातला जातो.

रावणची उंची 68 इंच असून तो संपूर्ण काळ्या रंगाचा असून एक पांढरा टिळा कपाळावर आहे. रावणमध्ये एका उत्तम अश्वात असणारे अनेक गुण असल्याने त्याची किंमत तब्बल 5 कोटी निश्चित करण्यात आली आहे. सारंगखेड्यात घोड्या बाजारात आतापर्यंत दोन हजार घोडे दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा होत नव्हती. मात्र यावर्षी यात्रा रद्द केली आहे. परंतु घोडेबाजाराला परवानगी देण्यात आलेली आहे. यावर्षी महागडे घोडे दाखल होत आहे. मात्र त्या घोड्यामध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे रावणाची.

सारंगखेड्यामधील यात्रेमध्ये मोठी उलाढाल 

या घोड्याला पाच करोड रूपयांची बोली लावली होती. त्यामुळे या घोड्याला पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून अश्व शॉकिंग सारंगखेड्याच्या खोडा बाजारात दाखल होत आहेत. जवळपास 400 वर्षांची परंपरा सारंगखेड्याच्या घोडा बाजाराला आहे. मात्र, येथील जीवन हे शेतीवरच आधारीत आहे. मात्र, घोडे बाजारामुळे येथील स्थानिक तसेच बाहेरच्या तरुणांना हाताला काम मिळते. यात्रेदरम्यान विविध प्रकारचे दुकाने, चहा, हाॅटेल, खेळणी याची दुकाने येथील स्थानिक लोक टाकतात. यातून त्यांची चांगली कमाई होते आणि पैसा मिळतो. यंदा जरी यात्रेला परवानगी देण्यात आली नसली तरी देखील घोडे बाजारामध्ये पैसांची मोठी उलाढाल होत आहे.

संबंधित बातम्या : 

PDCC Bank Election | दत्तामामांचे ‘हुश्श..’, पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्यमंत्री भरणेही बिनविरोध

छिंदमच्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी; नगरमध्ये महाविकास आघाडीला धक्का