AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Accident : चिमुकलीसह जोडपे कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, भरधाव ट्रक दुचाकीला धडकला अन्…

पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ग्रामीण भागात तर रस्त्यांची अत्यंत दयनीय स्थिती आहे. यामुळे रस्त्ये अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

Chandrapur Accident : चिमुकलीसह जोडपे कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, भरधाव ट्रक दुचाकीला धडकला अन्...
चंद्रपूरमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडकImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 14, 2023 | 1:32 PM
Share

चंद्रपूर / 14 ऑगस्ट 2023 : कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने पती-पत्नीसह तीन वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जणही जखमी झाले आहेत. निलेश वैद्य आणि रुपाली वैद्य अशी मयत जोडप्याची नावे आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी ताण निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डेही पडले आहेत. यामुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

रस्त्यावरील खड्डे आणि भरधाव ट्रकने केला घात

धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे राहणारे निलेश वैद्य हे पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीसह बल्लारपूरला एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते. यावेळी भरधाव ट्रक मागून येताना त्यांनी पाहिले. मात्र रस्त्यात मोठमोठे खड्डे असल्याने त्यांना बाईक साईडला घेत येत नव्हती. अखेर ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तिघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोळसा खाणींमुळे राजुरा रोडवरुन मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक

राजुरा परिसरात कोळसा खाणी असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होत असते. यामुळे ट्रकचा वावर या परिसरात अधिक आहे. त्यातच या मोठमोठे खड्डे पडले आहे. मात्र प्रशासनाकडून या खड्यांच्या समस्येकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. यामुळे कधी ट्रकच्या धडकेत तर कधी खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघात वारंवार होत असतात. अनेकांना या अपघातात जीव गमवावा लागला आहे. यामुळे जनतेतून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान