Pune news : कामानिमित्त पुण्यात आलेले बिहारचे दोन तरुण इंद्रायणीत बुडाले, अद्याप शोध सुरु

काही महिन्यांपूर्वीच उदरनिर्वाहासाठी बिहारमधून पिंपरीत आले होते. पण नदीत पोहण्याचा मोह झाला आणि भलतंच घडलं. नदीवर गेले ते परतले नाही म्हणून तिसरा पहायला गेला आणि त्याला धक्काच बसला.

Pune news : कामानिमित्त पुण्यात आलेले बिहारचे दोन तरुण इंद्रायणीत बुडाले, अद्याप शोध सुरु
पिंपरीत इंद्रायणी नदीत दोन तरुण बुडालेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 12:32 PM

पिंपरी चिंचवड / 14 ऑगस्ट 2023 : पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी येथे दोन तरुण कामगार इंद्रायणी नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 48 तासांपासून बेपत्ता तरुणांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप ते सापडले नाहीत. अग्निशमन दल आणि पोलीस विभाग घटनास्थळी तरुणांचा शोध घेत आहे. शक्तिमान कुमार आणि सोनू कुमार अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. सदर तरुण मूळचे बिहारमधील रहिवासी असून, इंद्रायणी नदी परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला होते. तिसरा सहकारी दोघे आले नाही म्हणून पहायला नदीवर गेला असता ही घटना उघडकीस आली आहे.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले

बिहारमधील रहिवासी असलेले शक्तिमान कुमार आणि सोनू कुमार हे कामानिमित्त पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे राहत होते. मोशी येथे एका खाजगी कंपनीत दोघे नोकरी करत होते. दोघांनाही इंद्रायणी नदीत पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे दोघेही जण शनिवारी सकाळी नदीत पोहायल गेले. मात्र नदीत उतरताच पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले.

बराच वेळ परतले नाही म्हणून तिसरा पहायला गेला तर…

तरुणांचा तिसरा सहकारी त्यांची रुमवर वाट पाहत होता. बराच उलटून गेला तरी दोघे परतले नाहीत. त्यामुळे तिसरा सहकारी दोघांना बघायला नदीवर गेला. तेथे गेल्यानंतर ते दोघेही कुठे दिसले नाहीत. मात्र नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे कपडे आढळून आले. यामुळे त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलीस, एनडीआरएफ आणि अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गेल्या 48 तासांपासून तरुणांचा शोध सुरु आहे. मात्र अद्याप दोघेही सापडले नाहीत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'.
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?.
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ.
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्..
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्...
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली.
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.