AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli News : पाच मित्र पिकनिकला गेले होते, पण नियतीच्या मनात वेगळेच होते अन् पिकनिक जीवावर बेतली !

बऱ्याच दिवसांनी सर्व मित्र एकत्र भेटले होते. मग सर्वांनी पिकनिकचा प्लान केला आणि गोदावरी नदीवरील नरगम घाटावर गेले. मात्र ही पिकनिक दोघांसाठी अखेरची ठरली.

Gadchiroli News : पाच मित्र पिकनिकला गेले होते, पण नियतीच्या मनात वेगळेच होते अन् पिकनिक जीवावर बेतली !
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 14, 2023 | 10:54 AM
Share

व्येंकटेश दुडमवार, टीव्ही 9 मराठी, गडचिरोली / 14 ऑगस्ट 2023 : पिकनिकला गेलेल्या दोन जणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गडचिरोलीत घडली आहे. सिरोंचा तालुका येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. मयतांपैकी एक अल्पवयीन आहे. हिमांशू मून असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिरोंचा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सिरोंचा पोलीस पुढील तपास करत आहेत. दोघेही नागपूर येथील रहिवासी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. यामुळे नदीवर अंघोळीसाठी टाळण्याचे आवाहन करुनही तरुण मंडळी ऐकत नाहीत. यातूनच अशा घटना घडत नाहीत.

नागपूरही कार्यक्रमासाठी गडचिरोलीत गेले होते

हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह एका कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता. तेथून तो आपला मित्र सुमन मुंसेट्टी याला भेटण्यासाठी सिरोंचाजवळील चिंतलपल्ली येथे गेला. तेथून सर्व मित्रांनी गोदावरी नदीवरील नरगम घाटावर अंघोळीचा बेत केला. सर्वजण नरगम घाटावर पोहचले आणि अंघोळीसाठी नदीत उतरले. नागपूर जिल्ह्यातील पाच मित्र गडचिरोलीतील सिरोंचा येथील नरगम नदी घाटावर पिकनिकला गेले होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

नदीत अंघोळीसाठी उतरल्यानंतर खोल पाण्यात सर्वजण बुडू लागले. मात्र तिघे जण कसेबसे जीव वाचवून पाण्यातून बाहेर पडले. मात्र हिमांशु आणि सुमन पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवले.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.