Video : सहस्त्रकुंड धबधब्याचा रौद्रावतार 8 दिवसांनंतरही कायम, हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी

गेल्या आठ दिवसांपासून सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा रौद्रअवतार आजही कायम आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने पर्यटक इथल्या धबधब्यावर गर्दी करताना दिसून येत आहेत.

Video : सहस्त्रकुंड धबधब्याचा रौद्रावतार 8 दिवसांनंतरही कायम, हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी
सहस्त्रकुंड धबधबा
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 8:39 AM

नांदेड : संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस बरसोय. त्यामुळे ओढे, नदी, नाले दुधडी भरुन वाह आहेत. अनेक नद्या-उपनद्यांना पूर आलाय. धबधबेदेखील फेसाळले आहेत.  गेल्या आठ दिवसांपासून सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा रौद्रअवतार आजही कायम आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने पर्यटक इथल्या धबधब्यावर गर्दी करताना दिसून येत आहेत.

नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने बरसत असलेल्या पावसाने पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहतेय. त्यातूनच पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड इथे असलेल्या धबधब्याचे अक्राळविक्राळ स्वरुप आठ दिवसापासून कायम आहे.

सहस्त्रकुंडचं फेसाळतं रुप अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

एरव्ही पावसाळ्यात एखाद्या दिवशीच धबधब्याचे असे दुर्मिळ दृश्य पहायला मिळत असते, यंदा मात्र गेल्या शनिवारपासून आजपर्यंत धबधब्याचा रौद्र अवतार कायम आहे. त्यामुळे यंदा हजारोंच्या संख्येने पर्यटकांना हे नयनरम्य दृश्य पहायला मिळतंय.

जाणून घ्या सहस्त्रकुंड धबधब्याविषयी…

यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्‍यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे 125 कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ‘इस्लापूर पाटी’ पासून ५ कि.मी तर किनवटपासून 50 कि.मी. अंतरावर आहे.

सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. मराठवाडा-विदर्भाची सीमारेषा म्हणजे पैनगंगा नदी आहे. मराठवाड्यातील हिंगोली नांदेड जिल्ह्याला लागून ही नदी वाहते. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात मोडतो. हा धबधबा उमरखेड पासून 70 किलो मीटर वर तर जिल्हा मुख्यालयापासून 181 किमीवर आहे. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसतं.

(Tourists Crowd to Sahastrajund Falls in Nanded)

हे ही वाचा :

Video : रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.