घरगुती सिलिंडरचा रिक्षासाठी वापर; मुर्तिजापूरमधून तीन जणांना अटक

घरगुती सिलिंडरमधील गॅस ऑटो रिक्षात भरणाऱ्या तीन जणांना मुर्तिजापूरमधून अटक करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संबंधित आरोपी हे घरगुती वापराचा गॅस ऑटो रिक्षामध्ये भरून देत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

घरगुती सिलिंडरचा रिक्षासाठी वापर; मुर्तिजापूरमधून तीन जणांना अटक
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 7:19 AM

अकोला : घरगुती सिलिंडरमधील गॅस ऑटो रिक्षात भरणाऱ्या तीन जणांना मुर्तिजापूरमधून अटक करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संबंधित आरोपी हे घरगुती वापराचा गॅस ऑटो रिक्षामध्ये भरून देत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. सय्यद रियाज सय्यद हुसेन, अब्दुल समीर अब्दुल जफिर आणि अमहद खान राहेमद खान असे आरोपींची नावे आहेत.

1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तिजापूरमधील जुनी वस्ती पठाणपुरा परिसरात घरगुती सिलिंडरमधील गॅस ऑटो रिक्षामध्ये भरू दिलाी जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या छाप्यामध्ये 1 लाख 40 हजार 250 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ऑटो आणि गॅस सिलिंडरचा समावेश आहे. सय्यद रियाज सय्यद हुसेन 50, अब्दुल समीर अब्दुल जफिर 30 आणि अहमद खान राहेमद खान 30 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

घरगुती सिलिंडरच्या व्यवसायिक वापरास प्रतिबंध

घरगुती सिलिंडर हे 14 किलोचे असतात. ते फक्त घरगुती कामांसाठीच वापरता येतात. त्याचा व्यवसायिक कारणासाठी वापर करण्यास बंदी आहे. याचे कारण म्हणजे घरगुती सिलिंडर हे व्यवसायिक सिलिंडरच्या तुलनेमध्ये स्वस्त असतात. घरगुती सिलिंडरचा व्यवसायिक कामासाठी वापर केल्यास ती एक प्रकारची सरकारची फसवणूक मानली जाते. असे करताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.

संबंधिंत बातम्या 

Omicron Update | राज्याला दिलासा! डोंबिवली ओमिक्रॉनाबाधिताच्या संपर्कातील सर्व कोरोना निगेटिव्ह, तरीही सावधान!

Ashish Shelar: राज्यात गब्बरचे राज्य आहे काय?, नायरमधील प्रकरणावरून शेलारांचा संतप्त सवाल

omicron : जगावर दुहेरी संकट, ओमिक्रोनसोबतच डेल्टाचाही अमेरिका, युरोपात हाहा:कार

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.