VIDEO: अमरावतीत मुक्तगिरीचं सौंदर्य फुललं, 250 फूट उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ

पावसाळा म्हटलं की निसर्गाचं सौंदर्य अगदी ओसंडून वाहतं. अमरावती जिल्ह्यातही हेच दृष्य आहे. अमरावतीतील परतवाडापासून 10 किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत मुक्तागिरी धबधबा सध्या निसर्ग सौंदर्याने फुलला आहे.

VIDEO: अमरावतीत मुक्तगिरीचं सौंदर्य फुललं, 250 फूट उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ


अमरावती : पावसाळा म्हटलं की निसर्गाचं सौंदर्य अगदी ओसंडून वाहतं. अमरावती जिल्ह्यातही हेच दृष्य आहे. अमरावतीतील परतवाडापासून 10 किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत मुक्तागिरी धबधबा सध्या निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. नाग नदीवरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

निसर्गाच्या सानिध्यात तसेच धबधब्यातून पडणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याचा आनंद घेण्यासाठी मुक्तगिरीत पर्यटक हळूहळू दाखल होताहेत. मुक्तगिरी येथील हिरव्यागार वनराईने व धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे.

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरापासून काहीच अंतरावर सातपुडा पर्वतात हा धबधबा आहे. अतिप्राचीन मंदिरालगत जवळपास 250 फूट उंचावरून हा धबधबा कोसळतो. मध्यप्रदेशातून वाहत येणारी नाग नदीच्या प्रवाहामुळे हा धबधबा तयार झालाय. उंचावरून धबधब्याच्या रूपाने कोसळणारे पाणी त्याचप्रमाणे पाण्यातून उडणारे तुषार या सर्वाचा आनंद पर्यटक घेत आहेत.

या ठिकाणी जैन धर्मीयांचे श्रध्दास्थानसुद्धा आहे. धार्मिक स्थळ असल्याने शनिवार आणि रविवार मुक्तगिरी बंद ठेवण्यात येते.

हेही वाचा :

VIDEO: भंडारदरा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग, शेंडी, रतनवाडी, हरिश्चंद्र गड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

VIDEO | अतिवृष्टीमुळे गोव्याच्या दूधसागर धबधब्यावर थांबली रेल्वे, रेल्वे मंत्रालयाने शेअर केला मनमोहक व्हिडिओ

कोकणात कोसळलेल्या पावसाने आल्हाददायक वातावरण, गारवेली धबधबा ओसांडून वाहू लागला

व्हिडीओ पाहा :

Video of Muktagiri waterfall Amravati Nature beauty

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI