AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशिममधील ‘अलार्म काका’, दिवाळीला डफडे वाजवून गावकऱ्यांना जागं करण्याची 100 वर्षांची परंपरा

आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली अंघोळ असते. पहिली अंघोळ म्हटलं की आपल्याला मोती साबणाच्या जाहिरातीतील ते अलार्म काका नक्की आठवतात. तसेच, एक अलार्म काका खऱ्या आयुष्यातही आहेत. जे दार ठोठावून नाही तर डफडे वाजवून दिवाळीच्या दिवशी गावाला जागे करतात.

वाशिममधील 'अलार्म काका', दिवाळीला डफडे वाजवून गावकऱ्यांना जागं करण्याची 100 वर्षांची परंपरा
Washim Alarm Kaka
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Nov 04, 2021 | 8:09 AM
Share

वाशिम : आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली अंघोळ असते. पहिली अंघोळ म्हटलं की आपल्याला मोती साबणाच्या जाहिरातीतील ते अलार्म काका नक्की आठवतात. तसेच, एक अलार्म काका खऱ्या आयुष्यातही आहेत. जे दार ठोठावून नाही तर डफडे वाजवून दिवाळीच्या दिवशी गावाला जागे करतात.

साबणाच्या जाहिरातीतिल अलार्म काका तुम्ही बघितले असतीलच, पण वाशिम जिल्ह्यातील ‘भट उमरा’ गावात एक डफडेवाले काका आहेत. जे दिवाळीच्या दिवशी सकाळी चार वाजेपासून डफडे वाजवून सर्वांना जागे करतात. दिवाळीच्या निमित्ताने अनेक गावात शेकडो वर्षाच्या आगळ्या-वेगळ्या परंपरा जोपासल्या जातात.

असेच एक गाव आहे वाशिम जिल्ह्यातील भट उमरा. या गावातील शिवाजी आवारे हे मागील 50 वर्षांपासून डफडे वाजवून गावकऱ्यांना जागं करण्याचं काम करत आहेत. दिवाळीचे पाचही दिवस त्यांचा हा उपक्रम चालू असतो. त्या बदल्यात गावकऱ्यांकडूनही आवारे यांना दान दक्षिना दिली जाते. गेल्या 100 वर्षांपासून आवारे कुटुंबीयांनी ही परंपरा जोपासली आहे.

नरक चतुर्दशीच्या दिवशी अशी पूजा करा

पौराणिक मान्यतेनुसार अहोई अष्टमीच्या दिवशी उरलेल्या पाण्याने स्नान केल्याने शोभा वाढते. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या नरसिंहाचा या दिवशी अवतार झाला होता. कार्तिक महिन्यातील शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी हनुमानजींची विशेष पूजा केली जाते, असे केल्याने रोग दोषांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, तेव्हापासून या तारखेला नरक चतुर्दशी असे नाव पडले.

पूजेची पद्धत

संध्याकाळी घरातील प्रमुख व्यक्ती हरभरा डाळ, खीळ-बताशे, अगरबत्ती, पाणी, मोहरीच्या तेलाचा दिवा आणि 1 रुपयाचे नाणे घेऊन दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर, अगरबत्ती लावा आणि “ओम धूम धुमम् धुमावती स्वाः” या मंत्राचा जप करा. माता धुमावती (दारिद्र्याची देवी) कडे प्रार्थना करा की हे माता, आपल्या घरातून, कुटुंबातून आणि व्यवसायातून वर्षभर दारिद्र्य, रोग, दोष, वाईट नजर नाहिशी होवो. लोटाची प्रार्थना करून, ग्लास पाण्याने भरून घराच्या मुख्य दरवाजाच्या दाराच्या चौकटीवर ठेवून घरात प्रवेश करून नाल्याच्या बाजूला असलेल्या मुख्य दरवाजावर जळत असलेला अगरबत्ती, दिवा आणि दिवा लावा. असे केल्याने पूजकांच्या कुटुंबात आई धुमावतींचा आशीर्वाद वर्षभर राहतो.

संबंधित बातम्या :

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर

Govardhan Puja 2021 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी का केली जाते गोवर्धन पूजा? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली