AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका, वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सर्वोतपरी तयारी

लहान मुलांना जास्त धोका असल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. (Washim District Police Administration Started Preparation For Corona Third Wave)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका, वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सर्वोतपरी तयारी
corona virus
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 11:43 AM
Share

वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा लहान मुलांना प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाने अनेक उपाययोजनांची तयारी सुरु केली आहे. घराबाहेर कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करा. तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यावर भर द्या, अशी सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे. (Washim District Police Administration Started Preparation For Corona Third Wave)

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका

वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र येत्या काळात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यापासून लहान मुलांना जास्त धोका असल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करा

रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासाठी झटणारे पोलिस बांधव आणि त्यांचे कुटुंबीय तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांनी घरात जाण्यापूर्वी अंघोळ करून किंवा सॅनिटायझ करावे, अशी सूचना दिली आहे.

यामुळे घरातील लहान मुले किंवा इतर सदस्यांना संसर्ग होणार नाही. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्या आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आरोग्य तपासणी करता यावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, असे जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले.

वाशिम पोलिस दलाला कोरोनाचा घट विळखा 

वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. मात्र तरीही काळजी घेणं गरजेचे आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पोलीस दलालाही कोरोनाचा घट विळखा बसला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 540 पोलीस अधिकारी कोरोनाबाधित झाले होते. त्यात एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता.

(Washim District Police Administration Started Preparation For Corona Third Wave)

संबंधित बातम्या : 

औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन

पुण्यात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद, वाढत्या गर्दीमुळे महापालिकेचा निर्णय

Mumbai Unlock: मुंबईतील व्यापारी ठाकरे सरकारवर नाराज; निर्बंध शिथील करण्याची मागणी

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.