AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षण मिळालेल्या मराठ्यांना धोका? काय म्हणाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते राज्य पिंजून काढणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. सांगली येथे त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यात सध्या कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या मराठा समाजाला त्यांनी धोका असल्याचे सांगितले.

आरक्षण मिळालेल्या मराठ्यांना धोका? काय म्हणाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 17, 2023 | 3:47 PM
Share

सांगली | 17 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले आहे. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने पण एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करु नका या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अंबड तालुक्यातच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सांगलीत जरांगे पाटील यांची आज जाहीर सभा झाली. सध्या कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या मराठा समाजाला त्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानावरुन राज्यात आता नवीन वादाची फोडणी बसली आहे. काय म्हटले जरांगे पाटील…

हा वेढा तोडा

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी चारही बाजूने वेढा टाकण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहे. मराठा सामजाचा राग राग सुरु आहे. मराठा समाजातील काही जण पण मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. काहींनी त्यासाठी चंग बांधला आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाने हा वेढा तोडावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

आरक्षण मिळालेल्यांना धोका?

सर्व मराठा समाजाला त्यांनी आरक्षणाच्या लढाईला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मराठ्यांकडे आता लाखोंनी पुरावे मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंदी मिळत आहे. त्यांनी आपले आरक्षण 70 वर्षे खाल्ले, असा आरोप त्यांनी केला. आता तरी मराठा समाजाने शहाणं होणं गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणाला विरोध होत आहे. काही मराठा विरोध करत आहे. कुणबी म्हणून ज्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. त्यांचे आरक्षण पण धोक्यात असल्याचे ते म्हणाले. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध सुरु आहे. मराठे संपले तर सध्या आरक्षण मिळणाऱ्या मराठ्यांचे आरक्षण संपवायला सुद्धा ते मागेपुढे पाहणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.

आरक्षण दिले असते तर प्रगत जात

मराठा समाजाला 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा जात प्रगत झाली असती. मराठ्यांचे पुरावे असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही आणि पुरावे ही सापडू दिले नाहीत. आज तेच पुरावे बाहेर निघालेत फक्त मराठ्यांच्या ताकतीवर आणि एकजुटीवर हे पुरावे बाहेर आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांच्या या आंदोलनाला राज्य सरकारने प्रतिसाद दिला. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविषयी न्यायमूर्तींची समिती गठित केली. ही समिती तिचे काम करत आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना