AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजी आजोबांसह नातवाचा शॉक लागून मृत्यू, यवतमाळवर शोककळा

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील डोल्हारीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडलीय. शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या आजी -आजोबासह नातवाचा शॉक लागू मृत्यू झालाय.

आजी आजोबांसह नातवाचा शॉक लागून मृत्यू, यवतमाळवर शोककळा
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 06, 2021 | 11:02 AM
Share

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील डोल्हारीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडलीय. शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या आजी -आजोबासह नातवाचा शॉक लागू मृत्यू झालाय. मारोतराव सुरदसे पत्नी मनकर्णाबाई सुरदसे आणि नातू सुमित सुरदसे अशी मृतांची नाव आहेत. या घटनेमुळं डोल्हारी परिसरात शोककळा पसरलीय.

डोल्हारी येथे विजेच्या शॉकेन आजी आजोबासह नातवाचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथे शेतात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मारोतराव सुरदसे (70) पत्नी मनकर्णाबाई सुरदसे (65) आणि त्यांचा नातु सुमित विनोद सुरदसे (16) असे मृतांची नावं आहेत.

नेमकं काय घडलं?

डोल्हारी येथे मारोतराव सुरदसे यांचे घनापूर रस्त्यावर शेत आहे. शेतामध्ये त्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी शेतात तिघेजण गेले होते. शेतातील लाईटजवळ मारोतराव यांना विजेचा शॉक लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना वाचवण्यासाठी पत्नी मनकर्णाबाई गेल्या. त्यांनाही विद्युत शॉक लागला. आजी आजोबांना जमिनीवर पडलेले पाहून शेतात असलेला नातू सुमित हा त्यांच्याकडे धावला. तेव्हा त्यालाही विजेचा जोरदार शॉक लागला. त्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

डोल्हारी परिसरावर शोककळा

मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे डोल्हारी परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृत्युची नोंद घेतली. तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या:

Video: पालघरच्या डहाणूमध्ये हिट अँड रन, पोलिसाच्या गाडीनं दुाचाकीस्वाराला उडवलं, तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार, गुन्हा दाखल

चंद्रपूरमध्ये बर्निंग कारचा थरार, काही मिनिंटामध्ये होत्याचं नव्हतं, पाहा व्हिडीओ

T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित

Yavatmal Dolhari Darvha three died due to electric current in farm

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप