सफाई करताना कुलरला चिपकला, वडिलांनाही विजेचा धक्का, वर्ध्यात तरुणाचा मृत्यू

| Updated on: Jun 05, 2021 | 5:41 PM

कुलरची साफसफाई करताना विजेचा धक्का लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. (wardha boy died by electric shock)

सफाई करताना कुलरला चिपकला, वडिलांनाही विजेचा धक्का, वर्ध्यात तरुणाचा मृत्यू
Follow us on

वर्धा : कुलरची साफसफाई करताना विजेचा धक्का लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमित बोरकर असं मृतकांच नाव असून जिल्ह्यातील पुलगाव जवळील हिवरा हाडके येथे ही घटना घडली आहे. या प्रकारमुळे नागरिकांमध्ये एक मनमिळावू तरुण गमावल्याची भावना असून हिवरा हाडके येथे शोककळा पसरली आहे. (young boy died by electric shock while cleaning cooler in Wardha)

कुलरची सफाई करताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार अमित बोरकर या तरुणाने रात्रीच्या सुमारास (4 जून) घरातल्या कुलरमध्ये पाणी भरले. यावेळी पाणी भरूनसुद्धा कुलरमधून हवा येत नसल्यामुळे त्याने कुलरची साफसफाई करण्याचे ठरवले. मात्र, साफसफाईदरम्यान त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. विजेच्या तीव्र धक्क्यामुळे तो कुलरलाच चिपकला. आपला मुलगा अमित हा कुलरला चिपकल्याचे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे धाव घेतली. तसेच त्याला वाचण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात असताना त्यांनासुद्धा विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला.

आईने वीजप्रवाह खंडित केला

हा सर्व प्रकार अमितच्या आईने पाहिला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यासु्द्धा कुलरकडे धावल्या. त्यांनी लगेच कुलरचे बटन बंद करुन वीजप्रवाह खंडित केला. त्यानंतर अमितची आई आणि वडिलांनी मिळून त्याला घटनास्थळापासून बाजूला केले.

युवकाला रुग्णालयात हलविले, मात्र शेवटी मृत्यू

हा प्रकार समोर आल्यानंतर आजूबाजूचे शेजारीसुद्धा अमितकडे धावले. त्यांनी जखमी युवकाला पुलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे येथील नागरिक शोकाकूल आहेत.

सुसाईड बॉम्बरची धमकी देऊन पैशांची मागणी

अंगावर बॉम्ब लाऊन बँक लुटण्याचे प्रकार आपण चित्रपटांमध्ये बघितले आहेत. मात्र, अशीच काहीशी घटना 5 जून रोजी वर्धेच्या सेवाग्राम येथील बँकेत घडत होती. पण बँकेतील अधिकाऱ्यांच्या चपळाईने संबंधित आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. विशेष म्हणजे आरोपीने बनावट बॉम्ब बनवून बँकेच्या कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक करत त्याच्याकडील साहित्य जप्त केलंय. आरोपीने आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून पैसे न दिल्यास सर्वांना संपवण्याची धमकी पत्रातून दिली होती

इतर बातम्या :

VIDEO : नाशिकमध्ये गुंडगिरी, भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद

वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका

’55 लाख रुपये द्या, अन्यथा बँक उडवून देईन’, वर्ध्यात सुसाईड बॉम्बरची धमकी देऊन पैशांची मागणी

(young boy died by electric shock while cleaning cooler in Wardha)