AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | गादीवर बसल्यावर मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षाने शपथ का घेतली? उद्धव ठाकरेंचा सवाल

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या विषयावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही मुद्दे उपस्थित केलेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील तरुणांना विंनती केली आहे. हिंसाचार घडवून महाराष्ट्राला बदनाम करण्याच षडयंत्र आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Maratha Reservation | गादीवर बसल्यावर मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षाने शपथ का घेतली? उद्धव ठाकरेंचा सवाल
uddhav thackeray press
| Updated on: Oct 31, 2023 | 1:39 PM
Share

मुंबई : “काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते. एकाला डेंग्यू झाला असं कळलं. दुसरे मुख्यमंत्री मराठा आणि महाराष्ट्रापेक्षा रायपूरला प्रचारासाठी गेले. आपल्या राज्यात जळत असताना लोकं रस्त्यावर उतरली असताना दुसऱ्या राज्यातील पक्षाचा प्रचार महत्त्वाचा वाटतो अशी लोक या समाजाला न्याय देऊ शकतो का? हा प्रश्न आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की, टोकाच पाऊल उचलू नका. तुमच्या सारख्या लढवय्यांची समाजाला, राज्याला गरज आहे. मराठा समाजातील तरुणांना विंनती करतो, की त्यांनी आत्महत्येसारख टोकाच पाऊल उचलू नका. आपसात मतभेद, जाळपोळ होईल असं करु नका” असं आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.

“जाळपोळी मागे हे दुसरे कोणी असू शकतात, हे दुसरे कोण आहेत, त्यांच महाराष्ट्राला बदनाम करण्याच षडयंत्र आहे. महाराष्ट्रात येऊ शकणारे उद्योग गुजरातला पळवले. महाराष्ट्राल असं बदनाम करायच की, नवीन उद्योग महाराष्ट्रात येणार नाहीत. मग नोकऱ्या मिळणार कशा” अस उद्धव ठाकरे म्हणाले. आज महाराष्ट्रात अस्वस्थतता आहे. समाजाच्या मनात भीती आहे. मराठ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, याबाबत दुमत नाही. मराठा स्वाभिमानी आहे, दुसऱ्याच्या पानातून खेचून घेण्याची त्याची इच्छा नाही. मराठा समाज, धनगर, ओबीसींच्या मनात धाकधूक आहे, आपलं काय होणार? असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘आमच्याशी बोलू नका, आम्ही सोबत आहोत’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरील मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली. “गादीवर बसल्यावर मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षाने शपथ का घेतली?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. मधल्या काळात हा प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल त्यांनी केला. काहीही करा, मार्ग काढा, आमच्याशी बोलू नका, आम्ही सोबत आहोत. महाराष्ट्राची एकजूट संपवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर सावध व्हा. आज मंत्रिमंडळाची बैठक होतेय, आपण वाट पाहू काय निर्णय होतो त्याचा? असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा