AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 फुटांची रुंदी 380 फुटांवर नेणार, पंढरपुराचा आराखडा बदलणार, कॉरिडोअरचा नेमका वाद काय? पाहा TV9 मराठी स्पेशल रिपोर्ट!

पंढरपूर कॉरिडॉरला सुब्रमण्यम स्वामींनी थेट पंढरपुरात येत विरोध केलाय. वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार करण्याची योजना सरकारनं आखलीय. याला स्थानिक आणि व्यापाऱ्यांनीही विरोध केलाय.

40 फुटांची रुंदी 380 फुटांवर नेणार, पंढरपुराचा आराखडा बदलणार, कॉरिडोअरचा नेमका वाद काय? पाहा TV9 मराठी स्पेशल रिपोर्ट!
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 24, 2022 | 11:54 PM
Share

सोलापूर : वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर तयार करण्याची योजना सरकारनं आखलीय. मात्र या कॉरिडॉरला असणारा स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र झालाय. सुब्रमण्यम स्वामी यांनीही पंढरपुरात जात यात कॉरिडॉरला तीव्र विरोध केलाय. कॉरिडॉरमुळं होणाऱ्या रस्ते रुंदीकरणात अनेक घरं, मंदीरं, वाडे आणि मठ जाणार आहे. याच गोष्टीला स्थानिकांनी आणि व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. पंढरपूर कॉरिडॉरबाबत अनेक आराखडे समोर आले आहेत. पंढरपुरात श्रीकृष्ण मंदिर चौफाळ्याचा परिसरपासून ते महाद्वारपर्यंतच्या रस्त्यांची रुंदी ही साधारण 40 फूट आहे. मात्र नवीन आराखड्यात हीच 40 फुटांची रुंदी साधारण 380 फुटांवर नेण्याचं नियोजन आहे.

याचा परिणाम म्हणून विठ्ठल मंदिराच्या दोन्ही बाजूची घरं, दुकानं, काही मंदिरांचं संपादन करावं लागेल. याच संपादनाला विरोध होतोय.

मुख्यभागी विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि आजूबाजूच्या भागातून जवळपास 25 हून जास्त छोटे रस्ते मंदिराकडे जातात. यापैकी अनेक रस्त्यांची रुंदी ही 5 फुटांहून कमी आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकूण 22 रस्त्ये रुंदीकरणाचं नियोजन आहे. ज्यात काही घरं बाधित होणार आहेत.

असं म्हणतात की मुघली आक्रमणापासून वाचण्यासाठी मंदिराकडे जाणारे हे रस्ते घरं उभारुन मुद्दामहून अरुंद करण्यात आले. कारण या रस्त्यांमधून शत्रूंच्या घोडदळाला मंदिरांपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण व्हावेत.

मात्र आता पंढरपुरातल्या गर्दीची व्यवस्था, आपत्कालीन मदतीसाठीच्या अडचणी दूर करण्यासाठी रस्ते रुंद करण्याचं नियोजन आहे.

मंदिराच्या काही अंतरावर नदीच्या काठाला लागून प्राचीन होळकर वाडा आहे. 272 वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा वाडा बांधला होता.

होळकर वाड्याच्या समोरच्या बाजूला शिंदे सरकार वाडा आहे. प्रस्तावित कॉरिडॉरमुळे हे वाडेही बाधित होणार आहेत.

याशिवाय पंढरपूर कॉरिडॉरमुळे इतर काय-काय बाधित होणार?

उत्तर महाद्वार आणि व्हीआयपी दर्शनव्यवस्था, भजन आणि कीर्तन हॉल, दोन मजली शॉपिंग सेंटर, महाद्वार भजन हॉल, बहुद्देशीय हॉल आणि संत ग्रंथालय, वारकरी सुविधा केंद्र, संत संग्रहालय, पश्चिम द्वार आणि प्रशासकीय इमारत आता नव्या कॉरिडॉरमुळे बाधित होणार असल्याची माहिती समोर आलीय.

मोठा बदल म्हणजे दर्शनमंडपाची इमारत आता अशी आहे. ती नव्या आराखड्यात अशी बनवण्याचं नियोजन आहे. सध्याचा 5 मजली दर्शनमंडप 1987 साली बांधला होता. मात्र पाच मजले चढण्यासाठी होणाऱ्या त्रासामुळे सध्या या मंडपातला फक्त पहिलाच मजला सुरु आहे. कारण मंडपात लिफ्टची सुविधा नाहीय.

सरकारच्या नियोजनानुसार नव्या दर्शन मंडपातल्या इमारतीतच प्रशासकीय कार्यालय, विश्रांती गृह, पार्किंग, पोलीस चौकी, रुग्णवाहिका पार्किंग, अग्निशमन यंत्रणासह अनेक गोष्टींचं नियोजन करण्यात आलंय.

याशिवाय रस्त्यावरची गर्दी कमी होण्याच्या उद्देशानं एक स्कायवॉकही नियोजीत आहे.

मंदिरापासून काही अंतरावर चंद्रभागेच्या काठी भुतेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराच्या काही अंतरापासून स्कॉयवॉक सुरु होईल. तिथून हा स्कायवॉक नदीच्या काठाला लागून पुढे महाद्वारापर्यंत जाईल. आणि तिथून वारकरी उतरुन पुढे दर्शनासाठी जाऊ शकतात.

वाराणसी आणि उज्जैनमध्येही आधी कॉरिडॉरला विरोध झाला होता. पण काही काळानंतर तो विरोध मावळला. आता पंढरपुरातही नागरिकांनी कॉरिडॉरला विरोध केलाय. आणि त्याला सुब्रमण्यम स्वामींनी साथ दिलीय. त्यामुळं सरकार काय भूमिका घेणार हेच पाहावं लागेल.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.