Pandharpur Election Result 2021 | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम, अंतिम निकाल रात्री उशिरा लागण्याची शक्यता

| Updated on: May 02, 2021 | 10:26 AM

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Pandharpur mangalwedha bypoll Election Result late night)

Pandharpur Election Result 2021 | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम, अंतिम निकाल रात्री उशिरा लागण्याची शक्यता
voting
Follow us on

पंढरपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र हा निकाल रात्री उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pandharpur mangalwedha bypoll Election Result 2021 will be announced at night)

मतमोजणीला सुरुवात

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी आज रविवारी 2 मे रोजी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झाली आहे. हा निकाल येण्यास रात्र उजाडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनामुळे 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यामुळेच निकाल येण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आघाडीवर

 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांच्यात कांटे की टक्कर

पाच फेरीच्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आघाडीवर

मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केलं आहे. विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले. या मतमोजणीसाठी 118 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 2 मे रोजी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. 14 टेबलांवर 38 फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 6 टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाच्या मोजणीसाठी दोन टेबल ठेवण्यात आलेत. तसेच 54 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस राखीव ठेवण्यात आलेत. टपाली मतदानाद्वारे 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी 3 हजार 252 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच 73 सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

कोरोना चाचणी बंधनकारक

मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच इतरांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी कोरोना चाचणी केली नाही, अशा संबंधितांसाठी मतदान कक्षाबाहेरील आरोग्य कक्षात चाचणी केली जाईल. तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता मतमोजणी कक्षा बाहेरील क्षेत्रात फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी, निवडणूक निकाल ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात येणार नाही. तो फक्त मतमोजणी कक्षात जाहीर करण्यात येईल. फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकाल सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून वेळोवेळी प्रक्षेपित करण्यात येईल. तसेच फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकालासाठी वोटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App) चा वापर करूनही पाहता येईल.

सीसीटीव्हीद्वारे मतमोजणीवर नजर 

मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून, त्यानुसार मतमोजणीवर नजर राहणार आहे. तसेच या ठिकाणी व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मतमोजणीच्या दिवशी अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम, आघाडीवर कोण?