माफ करा चंद्रकांतदादा, मी आज मुक्ती मागतेय : पंकजा मुंडे

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतल्याचं मला एकाही सूत्राने सांगितलं नाही, डोळे चोळत उठल्यावर कळलं , असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माफ करा चंद्रकांतदादा, मी आज मुक्ती मागतेय : पंकजा मुंडे

बीड :  स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर (Pankaja Munde Gopinath gad speech) बहुप्रतीक्षीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता, महादेव जानकर, सुरेश धस, पाशा पटेल, बबनराव लोणकर, अतुल सावे, हरीभाऊ राठोड, सूरजीतसिंह राठोड, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित होते.  (Pankaja Munde Gopinath gad speech)

यावेळी बहुप्रतीक्षीत असलेलं पंकजा मुंडे यांचं भाषण झालं,”मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर माहिती नाही. आता चेंडू भजापच्या कोर्टात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. शिवाय पंकजा मुंडेंनी भाजपच्या कोअर कमिटीचं सदस्यत्व सोडत असल्याचं जाहीर केलं.  पक्ष काढायचा की काय करयचं ते पुढे ठरवूच पण आता पक्षाने ठरवायचं आहे, असं म्हणत पंकजांनी भाजपला इशारा दिला.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वज्रमूठ आणि मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार, 26 जानेवारीला मुंबईतील ‘सुखदा’मध्ये कार्यालय सुरु करणार, असं पंकजा मुंडे म्हणाले.

“एकनाथ खडसेंनी आज मन मोकळे केले. मन मोकळे नाही केले की विष बनते. माझ्या जीवनात अनेक भाषणं केली, पण मागच्या दोन महिन्यात मी बोलले नाही. गेली 2 महिने मी भाषण केले नाही.  काय बोलावे असा प्रश्न आता पडतो. गरीबाच्या झोपडीत दिवा लागावा यासाठी मुंडे साहेबांचं काम होतं. तेच पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांनी मला तुमच्या झोळीत टाकलं. माझं भाग्य की मी त्यांच्या पोटी जन्मले”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

कोणी म्हणाले की पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत. प्रदेशाध्यक्षपद, विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद मिळवण्यासाठी दबाव, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. जर पदाच्या हव्यासावरुन आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून मुक्ती मागते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मुंडेंसाहेबांसारख्या कार्यकर्त्यांनी मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. आता जनसामान्यांचा पक्ष मूठभर लोकांच्या हातात आणून ठेवू नका. रिव्हर्स गियर टाकू नका. हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

आज मी कोणी नाही, माफ करा चंद्रकांतदादा, आज मी कोअर कमिटीची सदस्य सुद्धा नाही. कारण जर माझ्यावर आरोप होत असेल की मी पदासाठी दबाव आणत आहे, तर मी जाहीरपणे कोअर कमिटीच्या सदस्यपदापासून मुक्ती मागत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

भाजपात लोकशाही पद्धनीनं निर्णय होईल, तेव्हाच कोअर कमीटीत यायचं की नाही ते बघू, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

मी आज तुमच्यासाठी राजकारणात आहे. या वज्रमुठीबरोबर तुम्ही महाराष्ट्रात यायला तयार आहात की नाही? तुमच्यासाठी न्याय मागण्यासाठी आंदोलन करु. 26 जानेवारीला मुंडे साहेबांच्या नावाने कार्यालय उघडू. मराठवाड्यासाठी 27 तारखेला उपोषण करणार असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मृत्यूनंतरही मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास सुरुच आहे. माझे भाग्य, मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला. माझे दुर्दैव, मला मुंडेसाहेबांना अग्नी द्यावा लागला. चिल्लर पराभवाने मी खचणारी नाही. 12 दिवस टीव्ही चॅनेलचे माझ्याकडे लक्ष आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

आधी टीव्ही लावला की संजय राऊत दिसायचे, ते बोलत होते, ते करुन दाखवलं, पण मी काही न बोलताही टीव्ही लावल्यावर दिसायचे : पंकजा मुंडे

12 दिवसांपूर्वी रोज संजय राऊत दिसायचे, संजय राऊत रोज बोलत राहायचे, ते जे बोलायचे ते त्यांनी करुन दाखवलं. 1 तारखेनंतर मी न बोलताही टीव्हीवर दिसले,  1 तारखेनंतर माझ्याबद्दल लोक किती बोलत होते, असं पंकजा म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतल्याचं मला एकाही सूत्राने सांगितलं नाही, डोळे चोळत उठल्यावर कळलं , असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

आवाज दाबू नका, झालं ना सगळं आता, मी एवढे सूत्र बघितले की, एवढे सूत्र हुशार होते तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतलेली तुम्हाला का कळलं नाही? , असा प्रश्न पंकजा मुंडेंनी माध्यमांना विचारला.

निवडणूक निकाल ते उद्धव ठाकरे सरकार स्थापन होईपर्यंत खूप अनुभव आले. मी बंड करणार ही पुडी कुणी सोडली, माझ्या पोस्टमध्ये काय लिहलंय पाहा. देश प्रथम, पक्ष द्वितीय, मी तृतीय हे मी जगले. रात्री 12 वाजता साहेब बोलले मी येतोय आणि सकाळी एक फोन कॉलने उध्वस्त केलं. लोक मुंडे साहेब गेलेत हे स्वीकारायला तयार नव्हते. मुंडेसाहेब गेले हे लोक स्वीकारतच नव्हते, अंत्यविधीवेळी लोक दगडफेक करत होते.

आजही गोपीनाथरावजींच्या हाती जनसंघाचा झेंडा. गोपीनाथरावांची समाधीही कमळावर आहे. फाटक्या लोकांनी माझ्यासाठी संघर्षयात्रा काढली होती, गोपीनाथ मुंडेंनी कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. नाथाभाऊ बोलले ते खरं आहे. गोपीनाथरावांचं रक्त आळणी नाही,  गोपीनाथरावांच्याही पाठीत खंजीर खुपसला, मला तुम्ही वाघीण म्हणता, विरोधकांना ते खुपते, असं  पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे बेमाईन होणार नाही. भाजपने आता आत्मचिंतन करावं. आता बॉल बाजपच्या कोर्टात आहे. मुख्यमंत्री माझा भाऊच आहे. गोपीनाथरावांच्या नावाने पदर पसरायचा नाही. 26 जानेवारीला गोपीनाथ प्रतिष्ठानचे कार्यालय,27 जानेवारीला औरंगाबादेत लाक्षणिक उपोषण करणार अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.

एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, त्यांचं वाक्य नेहमी आठवतं, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम्हे साथ लेकर डुबेंगे, जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, तोच प्रसंग माझ्याही आयुष्यात, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.

संबंधित बातम्या 

पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे 

बारामतीची पालखी वाहणार नाही, पण चंद्रकांतदादा तुम्ही त्रास देता हे मान्य करा : महादेव जानकर 

Published On - 2:40 pm, Thu, 12 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI