बारामतीची पालखी वाहणार नाही, पण चंद्रकांतदादा तुम्ही त्रास देता हे मान्य करा : महादेव जानकर

माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar Gopinath Gad) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हल्लाबोल केला.

बारामतीची पालखी वाहणार नाही, पण चंद्रकांतदादा तुम्ही त्रास देता हे मान्य करा : महादेव जानकर

बीड : माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar Gopinath Gad) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हल्लाबोल केला. “मुंडेसाहेबांची ज्या पक्षात जडणघडण घडली, ज्या पक्षाने नेतृत्व दिलं, त्या पक्षाचा अपमान करणं म्हणजे पंकजाताईंचा अपमान होईल, त्यामुळे शांतता राखा” असं आवाहन महादेव जानकर (Mahadev Jankar Gopinath Gad)  यांनी कार्यकर्त्यांना केलं. त्याचवेळी जानकरांनी चंद्रकांत पाटलांना मी भाजपचा नाही, मी माझ्याच पक्षाचा आहे, असं म्हणत टोला लगावला.

बांधवांनो, हार जीत होत असते, त्याला घाबरुन जायचं नसतं. जो तो पक्ष दखल घेत असतो. मात्र आपल्या नेत्याच्या पाठिशी खंबीर उभं राहायचं असतं, हे परळीकरांनो लक्षात ठेवा. आपण जरं खऱ्या अर्थाने ताईंच्या मागे उभे राहिलो असतो, तर पंकजा ताईंचा पराभव झाला नसता. माझी विनंती, ताई सक्षम आहेत, त्या निर्णय घेतील, पण आपण डिवचण्याच्या भूमिकेत राहू नका, असं आवाहन महादेव जानकर यांनी केलं.

मी तर एनडीएचा घटकपक्ष आहे दादा, तुम्ही कितीही त्रास दिला तरी आम्ही तुमच्यासोबतच राहू. आमची नियत साफ आहे, पण तुम्ही त्रास देता हे मान्य करावं लागेल. पण दादा, आम्ही जोडलो आहोत ते गोपीनाथ मुंडेंमुळे.  दादा, तुम्हाला आम्हीच सत्तेत आणू. आमची नियत साफ आहे, आमच्या मनात खोट नाही. म्हणून माझी विनंती आहे, आम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन मोठं होणार नाही. बारामतीची पालखी वाहून मोठं होणार नाही. आम्हाला न्याय द्यायचं काम यांनीच केलं आहे. आम्हाला शिव्या दिल्या, मारलं तरीही यांच्यासोबतच राहायचं आहे, हे विसरता कामा नये, असं महादेव जानकर म्हणाले.

इथून पुढे आम्हाला अशी वागणूक देऊ नये अशी चंद्रकांत दादांना विनंती आहे, असं म्हणत जानकरांनी भाषण आटोपतं घेतलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *