Govind Pansare Murder Case: गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 10 संशयितांना न्यायालयात हजर; दोघे फरार; पुढील सुनावणी 23 ऑगस्टला…

कोल्हापूर : सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या खूनप्रकरणी (Murder) शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात दोष निश्चिती (Determination of guilt in District and Sessions Court)  करण्यात येणार होती. पानसरे हत्या प्रकरणातील 10 संशयितांना त्यावेळी हजर करण्यात आले होते, मात्र या प्रकरणाची सुनावणी पुढील तारखेला घेण्याची विनंती आता सरकारी पक्षातर्फे करण्यात […]

Govind Pansare Murder Case: गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 10 संशयितांना न्यायालयात हजर; दोघे फरार; पुढील सुनावणी 23 ऑगस्टला...
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 10:23 PM

कोल्हापूर : सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या खूनप्रकरणी (Murder) शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात दोष निश्चिती (Determination of guilt in District and Sessions Court)  करण्यात येणार होती. पानसरे हत्या प्रकरणातील 10 संशयितांना त्यावेळी हजर करण्यात आले होते, मात्र या प्रकरणाची सुनावणी पुढील तारखेला घेण्याची विनंती आता सरकारी पक्षातर्फे करण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या मागणीप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी दोष निश्चितीसाठी 23 ऑगस्टला आता सुनावणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गोविंदे पानसरे खटल्याच्या तारखेकडे आता सगळ्यांच्या आता नजरा लागल्या आहेत. कोल्हापुरात शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी 10 संशयितांना हजर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.

त्यानुसार बंगळूरू येथील कारागृहातून अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित डेगवेकर, अमित बद्दी, गणेश मिस्कीन या सहाजणांना कर्नाटक पोलिसांकडून हजर करण्यात आले, तर पुण्यातील येरवडा कारागृहातून डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे या तीन संशयिताना दुपारी न्यायालयात हजर गेले केले.

पुढील तारखेची मागणी

यापूर्वीच जामिनावर सुटलेला आणखी एक संशयित समीर गायकवाड असे एकूण दहा संशयित न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. मात्र या प्रकरणातील अन्य दोघे संशयित फरार असल्यामुळे आणि एटीएसकडे वर्ग करण्याच्या संदर्भातील माहितीची प्रतही प्राप्त झाली नसल्याने पुढील तारखेची मागणी करण्यात आली होती, त्याप्रमाणे न्यायालयानेही ही मागणी केली आहे.

अद्याप दोघे फरारच

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील याआधीच 10 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते, मात्र याच प्रकरणातील ज्यांच्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते संशयित आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार अद्याप फरारच आहेत.

एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी

त्यामुळे पानसरे कुटुंबीयांनी या गुन्ह्याचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याची केलेली मागणी उच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी त्या आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झाली नसल्याने त्या आदेशात नेमके काय म्हटले आहे हे माहीत नाही. त्यामुळे येथील सुनावणीसाठी पुढील तारीख द्यावी, अशी विनंती न्यायालयास केली आहे. त्यावर संशयित आरोपींचे वकील ॲड. समीर पटवर्धन यांनीही हरकत घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने दि. 23 ऑगस्टला सुनावणी होईल असे स्पष्ट केले आहे.

विचारवंतांच्या हत्येमुळे साऱा देश हादरला

महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या विचारवंतांच्या हत्येमुळे साऱा देश हादरला होता,नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंताच्या हत्या झाल्याने महाराष्ट्रासह देशपातळीवरही याविरोधात आवाज उठवण्यात आला होता, त्यामुळे आता 23 ऑगस्टकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.