AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grampanchayat Election Result : भांडण शिवसेना आणि शिंदे गटाचं, लाभ भाजपला; , 80 हून अधिक जागा जिंकल्या, शिंदे गटासह इतरांच्या पदरात काय पडलं?

शिंदे गटाच्या पदरात 40 ग्रामपंचायती पडल्या आहेत आणि शिवसेनेच्या पदरात 27 ग्रामपंचायती पडलेल्या आहेत. काँग्रेस मात्र या रेसमध्ये सर्वात शेवटी आहे. काँग्रेसच्या हाती फक्त 22 ग्रामपंचायती लागलेल्या आहेत तर 50 च्या आसपास ग्रामपंचायत या इतर गटांच्या ताब्यात गेलेले आहेत.

Grampanchayat Election Result : भांडण शिवसेना आणि शिंदे गटाचं, लाभ भाजपला; , 80 हून अधिक जागा जिंकल्या, शिंदे गटासह इतरांच्या पदरात काय पडलं?
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Aug 05, 2022 | 5:28 PM
Share

आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Election Result) धुरळा उडत आहे. काही ठिकाणचे निकाल हाती लागलेले आहेत तर काही ठिकाणचे निकाल अद्याप येणे बाकी आहे. मात्र या निवडणुकीत भाजपची (BJP) गाडी सुसाट सुटली आहे. भाजपने आतापर्यंत 80 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या भांडणाचा भाजपला चांगलाच लाभ झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीने या ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी बाजी मारली आहे. 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाच्या पदरात 40 ग्रामपंचायती पडल्या आहेत आणि शिवसेनेच्या पदरात 27 ग्रामपंचायती पडलेल्या आहेत. काँग्रेस मात्र या रेसमध्ये सर्वात शेवटी आहे. काँग्रेसच्या हाती फक्त 22 ग्रामपंचायती लागलेल्या आहेत तर 50 च्या आसपास ग्रामपंचायत या इतर गटांच्या ताब्यात गेलेले आहेत.

ग्रामपंचायत निकाल, जिल्हा- पुणे

एकुण ग्रामपंचायत- 19

शिवसेना – 2

भाजप – 4

शिंदे गट – 2

राष्ट्रवादी – 9

काँग्रेस – 0

इतर – 0

निकाल राखून ठेवला – 2

जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का

भाजप- 06,

शिवसेना- 05

राष्ट्रवादी- 05

काँग्रेस- 05

शिंदे गट- 00

इतर- 03

जळगावमध्ये कोणती ग्रामपंचायत कुणाची?

एरंडोल तालुका

नंदखुर्द बु. शिवसेना नंदखुर्द खु. भाजपा

पारोळा तालुका

लोणीसिम भाजपा लोणी खु. राष्ट्रवादी काँग्रेस लोणी बु. राष्ट्रवादी काँग्रेस

रावेर तालुका

पिंपरी — शिवसेना मंगरूळ- जुनोने — काँग्रेस कुसुंबा बु. राष्ट्रवादी काँग्रेस

कुसुंबा खू. राष्ट्रवादी काँग्रेस लोहरा – काँग्रेस पाल — काँग्रेस माहमांडली ग्रुप काँग्रेस निमड्या – काँग्रेस पाडळे बु. शिवसेना सहस्त्रलिंग – बिनविरोध जीन्स राष्ट्रवादी काँग्रेस रणगांव– शिवसेना

अमळनेर तालुका

बहादरवाडी – खोकरपाट– भाजपा

चाळीसगाव तालुका

लोंजे — बिनविरोध आंबेहोळ– भाजपा तळेगाव — भाजपा कृष्णा नगर– शिवसेना सुंदर नगर — बिनविरोध चिंचगव्हाण – भाजपा

नाशिक जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 38 ग्रामपंचायत

शिवसेना- 00

भाजप- 14

शिंदे गट- 02

राष्ट्रवादी- 11

काँग्रेस – 00

प्रहार – 02

इतर स्थानिक आघाडी – 11

सोलापूर जिल्हा ग्रामपंचायतचा निकाल

एकूण ग्रामपंचायत- 25

शिवसेना – 4

भाजप – 9

शिंदे गट – 1

राष्ट्रवादी – 4

काँग्रेस – 0

इतर – 7

कराड तालुका ग्रामपंचायत निकाल, जिल्हा- सातारा

निवडणुक जाहिर झालेल्या ग्रामपंचायती- 9

निवडणुकीपूर्वी बिनविरोध 2

निवडणुक मतदान झालेल्या-7

शिवसेना-0

भाजप-1

शिंदे गट-1

राष्ट्रवादी-6 –

काँग्रेस-0

इतर स्थानिक आघाडी -1

ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा-धुळे

एकुण ग्रामपंचायत-52 शिवसेना 3+ शिंदे गट – 20+ भाजप- 15+ राष्ट्रवादी-०० काँग्रेस-10+

औरंगाबादेत शिंदेंची ताकद वाढली

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट ठरला सर्वात मोठा पक्ष आहे. 16 पैकी जिंकल्या 12 जागा जिंकत शिंदे गटाने बाजी मारली. सर्वात मोठ्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतही शिंदे गटाच्या ताब्यात गेलीय. तर शिवसेनेच्या हाती फक्त 2 ग्रामपंचायती लागल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या हाती मात्र भोपळा आलाय.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन