पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुखांची बदली, कारभार पुन्हा गणेश देशमुखांकडे

पनवेल महापालिका हद्दीत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गणेश देशमुख यांच्या हाती पुन्हा पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय

पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुखांची बदली, कारभार पुन्हा गणेश देशमुखांकडे
पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुखांची बदली, गणेश देशमुखांकडे कारभार

हर्षल भदाणे-पाटील, नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकाचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. ते भिवंडी-निजामपूरचे नवे महापालिका आयुक्त असतील. त्यांच्या जागी पूर्वीचेच आयुक्त गणेश देशमुख यांच्या हाती पनवेल महापालिकेचा कारभार देण्यात आला आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गणेश देशमुख यांच्या हाती पुन्हा पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. (Panvel Municipal Commissioner Sudhakar Deshmukh transferred, Ganesh Deshmukh new Municipal Commissioner)

ऑक्टोबर 2016 साली पनवेल महापालिकेची स्थापना करण्यात आली. डॉ. सुधाकर शिंदे हे पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त आणि प्रशासक होते. निवडणुकीच्या कालावधीमध्ये राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला. त्यानंतर पुन्हा डॉ . शिंदे यांनी कार्यभार स्वीकारला. पुढे त्यांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर नांदेड महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची या ठिकाणी बदली करण्यात आली. देशमुख यांनी पनवेलमध्ये कोरोना काळात चांगलं काम केलं. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल मनपा प्रशासनाचा कारभार त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवला. मागील वर्षी ऐन कोरोना सुरुवात होण्याच्या वेळी त्यांची ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली होती.

सुधाकर देशमुखांची भिवंडी-निजामपूर आयुक्तपदावर बदली

गणेश देशमुख यांची बदली झाल्यानंतर सुधाकर देशमुख हे पनवेलचे नवे आयुक्त झाले. त्यांनी कोरोनात प्रतिकूल परिस्थिती चांगले काम केले. त्याचबरोबर विकास कामे सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मालमत्ता कराचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाला. मात्र त्याला सर्वसामान्य जनतेकडून विरोध झाला. दरम्यान मंगळवारी शासनाने अध्यादेश काढून सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी बदली केली. त्यांच्या जागेवर या ठिकाणी काम केलेल्या गणेश देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

मालमत्ता कराच्या वसुलीटं मोठं आव्हान

गणेश देशमुख यांच्यासमोर मालमत्ता कराची वसुली हे मोठे आव्हान असणार आहे. एकूण पाच वर्षाच्या थकबाकीला सर्वसामान्य जनतेतून मोठा विरोध आहे. मनपा आयुक्त म्हणून यामध्ये तोडगा काढून मालमत्ता कर लागू करणे आणि त्याची वसुली करुन पनवेल महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर असणार आहे. त्याचबरोबर आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा योग्य पद्धतीनं सामना करणे हे आव्हान गणेश देशमुख यांचा समोर असणार आहे.

गणेश देशमुखांकडे प्रशासकीय अनुभव

गणेश देशमुख यांच्याकडे प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. ते उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात. पनवेल महापालिकेचा कारभार त्यांनी उत्तमरित्या हाताळलेला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून त्यांनी काम केलं आहे. कोरोनाच वैश्विक संकट योग्यरित्या हाताळण्याच्या अनुषंगाने त्यांची महापालिकेच्या आयुक्त पदी फेरनिवड करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

इतर बातम्या :

नवी मुंबईत नवे निर्बंध, दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

Photo : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला, भूमिपुत्रांचं सिडको घेराव आंदोलन

Panvel Municipal Commissioner Sudhakar Deshmukh transferred, Ganesh Deshmukh new Municipal Commissioner

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI