मोठी बातमी ! राज्यातली पहिली प्रवेशबंदी, परभणीमध्ये 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यातील प्रवाशांना परभणी जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. (parbhani administration passenger entry corona)

मोठी बातमी ! राज्यातली पहिली प्रवेशबंदी, परभणीमध्ये 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी
corona virus news
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 5:11 PM

अकोला : कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून तो थांबवण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तेथील स्थानिक प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यातील प्रवाशांना परभणी (Parbhani) जिल्ह्यात जाण्यासा मनाई करण्यता आली आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये परभणीच्या प्रवाशांना प्रवेश नसेल. पूर्व परवानगी घेतल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासासाठी सूट देण्यात येईल.  (Parbhani administration banned entry of eleven district passenger)

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून परभणीच्या जिल्हा प्रशासनाने अकोल्यातील बसेसना जिल्ह्यात येण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच, आज अकोला शहरातून परभणीला जाणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत.

परभणीत 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे येथील जिल्हा प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी न केल्यास, थेट कारवाई करण्याचे आदेश येथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच या 11 जिल्ह्यात बसेस तसेच खासगी वाहनाने जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांतून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या तसेच, परभणी जिल्ह्यातून विदर्भातील नमुद 11 जिल्ह्यात जाणाऱ्या खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतची माहिती परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर अकोला जिल्हा प्रशासनाकडूनही परभणीत जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. पूर्व परवानगी घेतल्यास अत्यावशक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, अचानकपणे प्रवेशबंदीचा नियम लागू केल्यामुळे परभणी तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यांतील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा नियम लागू करण्यापूर्वी पूर्वकल्पना द्यायला हवी होती, असा सूर प्रवाशांकडून आळवला जातोय.

इतर बातम्या :

धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट; आगामी काळात आणखी कडक निर्बंध?

कोल्हापुरात कोरोनाचा धोका वाढला, अंबाबाई आणि जोतिबांच्या दर्शनाच्या वेळेत बदल, पुन्हा देऊळ बंद?

(Parbhani administration banned entry of eleven district passenger)
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.