नाना पाटोलेंनी अभ्यास करून बोललं पाहिजे, संभाजी भिडे वेगळं व्यक्तिमत्व; भाजप नेत्याचं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule on Sambhaji Bhide : काही दिवसांनी शरद पवार 'या' एका गोष्टीसाठी अजित पवार यांची साथ देतील; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य

नाना पाटोलेंनी अभ्यास करून बोललं पाहिजे, संभाजी भिडे वेगळं व्यक्तिमत्व; भाजप नेत्याचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 2:59 PM

परभणी | 29 जुलै 2023 : नाना पाटोले यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. संभाजी भिडे हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा भाजपची संबंध जोडणे योग्य नाही. संभाजी भिडे यांचा विधानाचा सरकार योग्य चौकशी करेल, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. संभाजी भिडे यांनी काल अमरावतीत बोलताना महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेस करत आहे. काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर अमरावतीतील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. संभाजी भिडे यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसच आंदोलन सुरू आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील इथं करण्यात येत आहे. गांधीजींचा फोटो घेऊन काँग्रेस आंदोलन करत आहे.

यशोमती ठाकूर यांनीही आक्रमक होत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही. कुणीही वादग्रस्त टिप्पणी करू नये, असं मला वाटतं. ज्यांनी कुणी वादग्रस्त टिप्पणी केलेली असेल त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, असं बावनकुळे म्हणाले.

शरद पवार यांची भूमिका आज जरी वेगळी असली तरी कालांतराने वेगळं पण येतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्वच आमदार आणि खासदार अजित दादांच्या सोबत आहेत. काही काळानंतर शरद पवार ही विचार करतील की देशीसाठी सर्व एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे कालांतराने विचार बदलत असतात, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

हर घर दस्तक अभियानासाठी चंद्रशेखर बावनकुळे आज परभणीत आहेत. मोदी सरकारने केलेल्या नऊ वर्षांचं काम दिसून येत आहे . 3 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. सर्व आमदार खासदार त्या अभियानामध्ये सज्ज झालेले आहेत. भारताला सर्वोत्तम देश करण्याचा प्रयत्न केला. घरोघरी जाऊन आम्ही नऊ वर्षाच्या कामांची माहिती देतोय. सरकारचं का लोकांपर्यंत पोहोचवतो आहे, असं बावनकुळे म्हणालेत.

Non Stop LIVE Update
क्रॉस व्होटिंग, फुटलेल्या 'त्या' 7 आमदारांना काँग्रेसनं कसं पकडलं?
क्रॉस व्होटिंग, फुटलेल्या 'त्या' 7 आमदारांना काँग्रेसनं कसं पकडलं?.
जयंत पाटलांच्या पराभवाचा आनंद 'या' आमदारानं चिखलात लोळून लुटला
जयंत पाटलांच्या पराभवाचा आनंद 'या' आमदारानं चिखलात लोळून लुटला.
कोकणाच्या सौंदर्याची भुरळ प्राण्यांनाही..भातशेतात मोरांचा मुक्त संचार
कोकणाच्या सौंदर्याची भुरळ प्राण्यांनाही..भातशेतात मोरांचा मुक्त संचार.
रत्नागिरीत धुव्वाधार बॅटिंग, 24 तासात इतक्या पावसाची नोंद, IMDचा अलर्ट
रत्नागिरीत धुव्वाधार बॅटिंग, 24 तासात इतक्या पावसाची नोंद, IMDचा अलर्ट.
कल्याण-डोंबिवलीकरांना मुसळधार पावसानं झोडपलं, 'या' भागात गुडघाभर पाणी
कल्याण-डोंबिवलीकरांना मुसळधार पावसानं झोडपलं, 'या' भागात गुडघाभर पाणी.
राऊतच्या डोक्यावर परिणाम, तो पागल..; 'त्या' आरोपांवर शिरसाटांचा पलटवार
राऊतच्या डोक्यावर परिणाम, तो पागल..; 'त्या' आरोपांवर शिरसाटांचा पलटवार.
राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही? OBC नेत्यानं...
राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही? OBC नेत्यानं....
अरे भाई ये क्या है... मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलमधून पावसाच्या धारा
अरे भाई ये क्या है... मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलमधून पावसाच्या धारा.
'लाडकी बहीण'बद्दल सगळं काही... प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून..
'लाडकी बहीण'बद्दल सगळं काही... प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून...
राजकारणातील चाणाक्य कोण? शरद पवार की अजितदादा? विधानभवनासमोर झळकल बॅनर
राजकारणातील चाणाक्य कोण? शरद पवार की अजितदादा? विधानभवनासमोर झळकल बॅनर.