Sambhaji Bhide | ‘हा बिनअकलेचा पेंद्या, मनोहर भिडया’, संभाजी भिडेंवर काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

Sambhaji Bhide | 'भिडेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना या देशातून तडीपार करा. तुम्हाला व्हिडिओ कसे नाही सापडतं. तुम्ही भांग पिऊन येता का?" असा सवाल काँग्रेस नेत्याने विचारला.

Sambhaji Bhide | 'हा बिनअकलेचा पेंद्या, मनोहर भिडया', संभाजी भिडेंवर काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
Sambhaji Bhide
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 3:28 PM

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी भिडे यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केलं आहे. कुठे भिडे यांच्या फोटोला चपला मारल्या, तर कुठे रास्ता रोको करून रोष व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रातच हे चित्र दिसत आहे. भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात येत आहे. दरम्यान आता काँग्रेसच्या दोन आमदारांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेस आमदार विजय वेडट्टीवर यांनी संभाजी भिडेंवर हल्लाबोल केला.

‘तुम्ही भांग पिऊन येता का?’

“संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून नाही, तर देशातून ह्द्दपार केलं पाहिजे. ‘भिडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना महाराष्ट्रातून नाही, तर या देशातून तडीपार केलं पाहिजे. तुमची यंत्रणा सक्रीय केली पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसे नाही सापडतं. तुमचे लागेबंधे आहेत का? म्हणून तुम्ही बेजबाबदारपणे वागता का? राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तुम्ही भांग पिऊन येता का? हे सहन केलं जाणार नाही” असा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला.

‘विष पेरण्याच काम हा संभाजी भिडे करतोय’

“त्यांचं नाव संभाजी नाहीय, हे टोपण नाव आहे. मनोहर भिडे नाव आहे. मराठा आणि बहुजन समाजाच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली विष पेरण्याच काम हा संभाजी भिडे करतोय” असा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ‘हा बिनअकलेचा पेंद्या’

“महात्मा गांधीं विरोधात बोलण्याची संभाजी भिडेची औकात आहे काय? आंबे खाल्ल्याने मुलगा होतो म्हणणारा हा बिनअकलेचा पेंद्या, हा मनोहर भिडया. महात्मा गांधीबद्दल असं जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य करत असेल, सरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई करावी” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Non Stop LIVE Update
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.