नाना पाटोलेंनी अभ्यास करून बोललं पाहिजे, संभाजी भिडे वेगळं व्यक्तिमत्व; भाजप नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Jul 29, 2023 | 2:59 PM

Chandrashekhar Bawankule on Sambhaji Bhide : काही दिवसांनी शरद पवार 'या' एका गोष्टीसाठी अजित पवार यांची साथ देतील; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य

नाना पाटोलेंनी अभ्यास करून बोललं पाहिजे, संभाजी भिडे वेगळं व्यक्तिमत्व; भाजप नेत्याचं वक्तव्य
Follow us on

परभणी | 29 जुलै 2023 : नाना पाटोले यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. संभाजी भिडे हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा भाजपची संबंध जोडणे योग्य नाही. संभाजी भिडे यांचा विधानाचा सरकार योग्य चौकशी करेल, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. संभाजी भिडे यांनी काल अमरावतीत बोलताना महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेस करत आहे. काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर अमरावतीतील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. संभाजी भिडे यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसच आंदोलन सुरू आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील इथं करण्यात येत आहे. गांधीजींचा फोटो घेऊन काँग्रेस आंदोलन करत आहे.

यशोमती ठाकूर यांनीही आक्रमक होत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही. कुणीही वादग्रस्त टिप्पणी करू नये, असं मला वाटतं. ज्यांनी कुणी वादग्रस्त टिप्पणी केलेली असेल त्यांच्यावर
सरकार कारवाई करेल, असं बावनकुळे म्हणाले.

शरद पवार यांची भूमिका आज जरी वेगळी असली तरी कालांतराने वेगळं पण येतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्वच आमदार आणि खासदार अजित दादांच्या सोबत आहेत. काही काळानंतर शरद पवार ही विचार करतील की देशीसाठी सर्व एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे कालांतराने विचार बदलत असतात, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

हर घर दस्तक अभियानासाठी चंद्रशेखर बावनकुळे आज परभणीत आहेत. मोदी सरकारने केलेल्या नऊ वर्षांचं काम दिसून येत आहे . 3 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. सर्व आमदार खासदार त्या अभियानामध्ये सज्ज झालेले आहेत. भारताला सर्वोत्तम देश करण्याचा प्रयत्न केला.
घरोघरी जाऊन आम्ही नऊ वर्षाच्या कामांची माहिती देतोय. सरकारचं का लोकांपर्यंत पोहोचवतो आहे, असं बावनकुळे म्हणालेत.