Malegaon | मालेगाव आगारात ST कर्मचारी परतल्याने प्रवाशांना दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Employees Strike) मालेगावात (Malegaon) आता सुटण्याच्या मार्गावर आहे. 24 चालक व 31 वाहक कर्तव्यावर परतले. दरम्यान, बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची (Passengers) गर्दी झाली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Employees Strike) मालेगावात (Malegaon) आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. 24 चालक व 31 वाहक कर्तव्यावर परतले आहेत. दरम्यान, बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची (Passengers) तुडूंब गर्दी झाली होती. कर्मचारी वाढताच बसफेऱ्यातही वाढ झाली आहे.आजपासून 23 बसेस सुरू होऊन 45पेक्षा जास्त बस फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. फेऱ्या वाढल्याने प्रवाशांचादेखील चांगला प्रतिसाद मिळून येत आहे. आज मालेगाव आगारातून 94 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. बससेवा सुरू झाल्याने प्रवाश्यांची गर्दी वाढू लागली आहे. मालेगाव आगारातून सध्या नाशिक, पाचोरा, धुळे, नगर, सुरत या मार्गांवर तर जळगाव, पाचोरा, चोपडा, अमळनेर, धुळे या अगराच्या बसेसही येत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय. पण अद्यापही 312 कर्मचारी संपात सहभागी असून विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत.
Latest Videos
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी

